*तनुश्री कोविड हॉस्पिटल सावनेर तर्फे आयएमए सावनेर ला १,२१,००० ची आर्थिक देणगी*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः १ जुलै डॉक्टर्स डे चे औचित्य साधून डॉक्टर विजय धोटे डायरेक्टर, तनुश्री कोवीड हॉस्पिटल सावनेर व अध्यक्ष अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक शाखा नागपूर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर ला १२१००० ची आर्थिक देणगी दिली.
सदर निधीचा उपयोग आयएमए शाखा सावनेर यांनी विविध कार्यक्रमासाठी उदाहरणार्थ पावसाळ्यातील होणारे आजाराविषयी जनजागृती, कोरोना लसीकरणा बद्दल जनजागृती, रक्तदान व प्लाजमा दान शिबिरे आयोजित करण्याकरिता करावा अशी विनंती व अपेक्षा डाँ.विजय धोटे यांनी केली.
डॉ निलेश कुंभारे अध्यक्ष आयएमए सावनेर यांनी डॉक्टर विजय धोटे यांचे आभार मानले. आयएमए हॉल सावनेर येथे ४ जुलै २०२१ रोजी १० वाजता पासून रक्तदान शिबिराचे आयोजन “लोकमत रक्ताचं नातं” या मोहिमेअंतर्गत होत असल्याची माहिती दिली तसेच सदर रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावं अशी अपेक्षा केली. कार्यक्रमाप्रसंगी डॉ.आशिष चांडक डॉ.उमेश जीवतोडे डॉ. परेश झोपे डॉ. विलास मानकर डॉ.नितीन पोटोडे डॉ. प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते.