*दुर्गामातेवर आक्षेपार्ह पोस्ट करणारा जेरबंद*
*प्रतिनिधी – संतोष मडावी*
वडसा *- व्हाट्स आप द्वारे दुर्गा देवी बाबत आक्षेपार्य पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करीत धार्मिक भावना दुखाविल्याचे तक्रारीवरून वडसा येथील जगदीश बद्रे याचे विरुद्ध कोरपणा पोलीस ठाण्यात तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे*
*वडसा येथील जगदीश बद्रे यांनी आपल्या मोबाईल द्वारे राजुरा विधानसभा या व्हाट्स आप ग्रुप मध्ये 2 आक्टोंबर रोजी हिंदू धर्माची आराध्य दैवत दुर्गा देवी बाबत या धर्माच्या भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्देश्याने अतिशय अशील भाषेतील पोस्ट टाकली ,सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे याच वेळी अशी पोस्ट टाकल्याने कोरपणा येथील काही हिंदुवादी संघटनेने ,आणि दुर्गा देवी भक्तांनी कोरपणा पोलीस ठाण्यात तक्रार केली तक्रारी चे गांभीर्य पाहून पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमा अंतर्गत जगदीश बद्रे विरुद्ध कलम 295 A/505(2)/67 (अ) नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी हा अंधश्रद्धा निर्मूलन चा गडचिरोली जिल्हाध्यक्ष असल्याचे समजते पुढील तपास ठाणेदार अरुण गुरनुले यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.*