*शक्ती प्रदर्शनासह सुनील केदारांचा अर्ज दाखल*
*ढोल ताशांच्या गजरात हजारो हजार चहेत्यांनी काढलेल्या भव्य रैलीतून केले शक्ती प्रदर्शन*
*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले(सावनेर)
*सावनेरःसावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कद्दावर नेते म्हणून ख्याती प्राप्त विद्देमान आमदार सुनील केदार यांनी आज आपल्या हजारो हजार कट्टर समर्थक तसेच सहयोगी मीत्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या कार्यालयात दाखल केला*
*मागील 25 वर्षा पासून आधी सावनेर-पारशिवनी व सद्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र 49 वर एकहाती विजय संपादन करणारे सुनील केदार हे 2014 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे निवडून येणारे एकमात्र उम्मेदवार असुन सावनेर कळमेश्वर तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायत,ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समीती सदस्य, जिल्हा परिषद, नगर पालीका सदस्य अशी मोठी जमीनी कार्यकर्यांची फळी तसेच शेतकरी, कष्टकरी,सुशिक्षित अशिक्षीत बेरोजगार,महीला बचत गटांच्या समस्या सोवीण्याकरीता पुढाकार घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख असल्याने आपल्या विकास कार्यावर विश्वास आहे व क्षेत्रातील जनता यावेळीही मला आशीर्वाद देऊन विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला.*
*याप्रसंगी किशोर गजभीये,सौ अनुजा केदार,कु.पोर्णीमा केदार,विजय बसवार,पवन जैस्वाल,मनोहर कुंभारे,मनोज बसवार,निलेश पटे प्रमुख्याने उपस्थितीत होते*
*नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर भव्य कार्याकर्त्यांना संबोधित करत राज्य शासनानी चालवलेल्या मनमर्जी कारोभारावर खरपुस समाचार घेत म्हटले की एकीकडे बेरोजगारी वाढत आहे,शेतकरी हवालदिल होऊण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे,सोबतच आसमानी संकट ओला दुष्काळ,सुशिक्षित अशिक्षिक्षीतांच्या हाताला काम नाही,बाजार पेठीत ओस पडली आहे, माहिला सुरक्षीत नाहीत,हेच काय अच्छे दीन अश्या जनसामन्याच्या प्रश्नाचे उत्तर या निवडणूकीत मतदाते सत्ताधारींना नक्कीच विचारणार असे कणखर संबोधन करुण सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र परिवर्तनाची लाट आहे व सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास व्यक्त केला*