*आर्वी – तळेगांव महामार्ग येनार्या काही महिण्यात पुर्ण न झाल्यास स्थानिक जनप्रतिनीधीना येत्या निवडणूकीत त्यांची जागा दाखवुन देवु– आप चे अक्षय राऊत यांचा ईशारा*
वर्धा जिल्हा प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
आर्वी – तळेगाव राष्ट्रीय महामार्गचे 3 ते 4 वर्षांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरु असून या राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून या महामार्गाच्या कामात स्थानिक प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. येथील स्थानिक आमदार साहेब, खासदार साहेब, व वर्धा जिल्हा पालकमंत्री हे जाणून बुजून या कामा कडे दुर्लक्ष्य कां करीत आहे? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलेला आहे. महामार्गवर जाणे येणे करताना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.
येथील जनप्रतिनीधी भविष्यात या रोड वर एखादा मोठा अपघात होण्याची वाट तर पहात नाही ना?
या सर्व प्रकाराची दखल जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, व राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी न घेतल्यास लवकरच आम आदमी पार्टी आर्वी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व स्थानिक नागरिक रस्ता रोको आंदोलन करणार .
असी माहीती आम आदमी पार्टी चे जिल्हा सदस्य श्री अक्षय राऊत यांनी एका पत्रकार द्वारे जाहीर केले.