*वाघोली शेतातील दोन विहीरीच्या सिंचन साहित्य अज्ञात चोराने केली चोरी*
*सोलर पॅनल, २ मोटर पंप, केबल अश्या ९७ हजार रूपयांच्या मुद्देमाल चोरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वाघोली येथील गावाला लागुन असलेल्या राकेश काकडे च्या शेतातील व बाजुच्या शेतात असलेल्या विहीच्या सोलर पॅनल, २ एचपी मोटार पंप व १२५ फुट केबल असा एकुण ९७ हजार रूपयांच्या मुद्देमालाची अज्ञात चोराने चोरी केल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी, चोऱ्यांचे प्रमाण वाढत असुन बुधवार (दि.३०) जुन च्या सायंकाळी ६ वाजता ते (दि.१) जुलै च्या सकाळी ९ वाजता च्या दरम्यान राकेश गणेशराव काकडे वय ३२ वर्ष राहणार. वाघोली यांच्या गावाला लागुन असलेल्या शेतातील विहीरीवर असलेल्या सोलर पॅनल व ५ एचपी मोटार पंप रविंद्र ऐजन्सी कंपनीचे किंमत ५०,००० रूपये, ५० फुट केबल वायर ७,००० रू. बाजुला असलेल्या लक्ष्मीकांत काकडे यांचे शेत विहीरीची मोटार पंप किंमत ३०,००० रू. ५० फुट केबल वायर किंमत ७,००० रू. आणि आंनद काकडे यांचे शेत विहीरी चा २५ फुट केबल वायर किंमत ३,००० रू. असा एकुण ९७,००० (सत्यानऊ हजाऱ) रूपयाचे शेत विहीरीचे शेती सिंचन साहित्य अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने ऐन शेती लावणी च्या वेळेस शेतकरी अडचणीत आल्याने फिर्यादी राकेश गणेशराव काकडे यांनी कन्हान पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसानी अप क्रमांक. २३१/२१ कलम ३७९ भा दं वि नुसार अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोहवा नरेश वरखडे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.