*राज्यव्यापी निषेध आंदोलनाचे धर्मराज विद्यालया तील शिक्षकांचे समर्थन*
*पारशिवनी गट शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांनी ३२ मागण्या चे दिले निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे राज्यव्यापी निषेध आंदोलना निमित्य धर्मराज विद्यालय कांन्द्री-कन्हान येथील शिक्षकांनी काळी फिती लावुन शाळामध्ये आंदोलनाचे समर्थन करित पारशिवनी गट शिक्षणाधिकारी हयांना शिक्षकांच्या विविध ३२ मागण्याचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर ग्रामीण तर्फे (दि.५) जुलै राज्यव्यापी निषेध आंदोलना निमित्य धर्मराज विद्यालय कांन्द्री-कन्हान येथील शिक्षकांनी काळी फीत लावुन आंदोलनाचे समर्थन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा पदाधिकारी सुनिल पाटील, नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष सुनिल लाडेकर, नागपूर शहर कोषाध्यक्ष हरीश केवटे, पारशिवनी तालुका अध्यक्ष अनिल सारवे, कार्यवाह उदय भस्मे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पारशिवनी गट शिक्षणाधिकारी श्री. कैलास लोखंडे यांना शिक्षकांच्या विविध ३२ मागण्यां चे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अनिल मंगर,सतीश कसारे, प्रशांत वैद्य, विजय राठोड, अनिल राग, रमेश साखरकर, सुरेंद्र मेश्राम, विलास डाखोळे, बनकर सर, राजुसिँग राठोड, शिवचरन फंदे, सचिन गेडाम, योगीता गेडाम, नरेंद्र कडवे, हरीश पोटभरे, प्रकाश डुकरे, मनीषा डुकरे, विद्या बालमवार,आशा हटवार, चित्रा भोयर, तेजराम गवळी, दामोधर हाडके, गणेश चिंचुलकर, राजकुमार साखरे आदि सह मोठ्या संख्येत शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते.