*१२ आमदारांचे निलंबन रद्द करुन ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी*
*कन्हान , कामठी , व रामटेक येथे भाजपा पदाधिकार्यांनी केली निदर्शने , तहसीलदार व पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महाराष्ट्र विधानसभे च्या पहिल्या दिवशी भाजप च्या आमदारांनी ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या मुद्य्यावरुन विधानसभेत गोंधळ केल्याने सरकार ने भाजप चे १२ आमदार निलंबित केल्याचा जाहिर निषेधार्थ कन्हान , कामठी , व रामटेक येथे भाजपा पदाधिकार्यांनी तहसील कार्यालय समोर व पोलीस स्टेशन समोर राज्य सरकार च्या विरोधात जोरदार निदर्शने करुन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन तात्काळ १२ आमदार परत घेऊन राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे .
राज्याचा महाविकास आघाडी सरकार ने ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विशेष प्रयत्न न केल्याने व ईम्पिरिकल डाटा तयार न केल्याने सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिल्याने भाजपच्या आमदारांनी ओबीसी ला आरक्षण लागू करा हा मुद्दा विधानसभेत उठविण्याचा प्रयत्न केला असता सरकार ने भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले . ओबीसी समाजाला न्याय द्यावा व भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे . या करिता कन्हान , कामठी व रामटेक येथे भाजपा पदाधिकार्यांनी रस्त्यावर उतरुन तहसील कार्यालय समोर , व पोलीस स्टेशन समोर राज्याचा महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात जोरदार निदर्शने करुन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन तात्काळ ओबीसी आरक्षण लागू करुन १२ आमदारांना परत घेण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी जिल्हा परिषद उपगट नेता.वेंकटेश कारेमोरे, भाजप तालुका अध्यक्ष अतुल हजारे, कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे, राहुल किरपान , सौ.सरीता लसुंनते , कविता मुलमुले , उज्वला धमगाये , मनिषा मंडावी , संजय कनोजिया , उज्वल रायबोले , कपिल गायधने , रमेश चिकटे , पंकज वर्मा , लाला खंडेलवाल , संजय मुलमुले , नरेंन्द्र बंधाटे , दिलीप देशमुख , नंदकिशोर कोहळे , अतुल पोटभरे , सुभाष मानकर , सह मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .