*मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन.*
*ग्रामीण पत्रकार संघ कोरपना ता.जनरल मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन चे आयोजन.*
आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे
कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघ,जनरल मेडिकल प्रॉक्टिशन असोसिएशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ.विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सावंगी मेघे,समता फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवारी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले.अंदाजे 300 च्यावर परिसरातील नागरिकांनी या शिबिरात भाग घेऊन लाभ घेतला.सदर शिबीरात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी धर्मेंद्र सुलभेवार वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु.गडचांदूर होते तर उद्घाटन ठाणेदार गोपाल भारती यांनी केले.डॉ. सत्यजीत पोद्दार जि.स. सावंगी मेघे,डॉ.भोयर,डॉ.पी. पी.खेकडे,डॉ.प्रवीण लोनगाडगे,मनोज भोसेकर, डॉ.बु-हान,डॉ.रविंद्र हेपट,अमोल निमकर इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीती होती.सदर शिबीरासाठी विविध प्रकारे सहयोग करणारे ओम बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनरल मेडिकल प्रॉक्टिशनर असोसिएशन टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.संचालन हबीब शेख,आभार श्रीकांत मोहारे यांनी मानले.