*निवडून देऊ सुधीरभाऊना हा अमुचा निर्धार*
*विराट रॅलीसह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज*
आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे .
भाजप – शिवसेना – रिपाई ( आ ), रासप महायुतीचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मुल येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. मुल शहरात यावेळी विराट रॅली काढण्यात आली. जनसमुदायाला अभिवादन करत सुधीर मुनगंटीवार माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर , वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल , आ. नानाजी शामकुळे ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे , रिपाईचे सिद्धार्थ पथाडे महायुतीचे पदाधिकारी आदींसह उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अर्ज दाखल केला.
रॅलीच्या मार्गावर फेटेधारी महिलांकडून होणारी पुष्पवृष्टी , शंखनाद करणाऱ्या महिला , सर्वधर्मीयांच्या वेशभूषेत असलेले नागरिक अशी या रॅलीची अनेक वैशिष्ट्ये होती.
आपण केलेली विकासकामे आणि राबविलेले अनेक लोककल्याणकारी उपक्रम , राज्य व केंद्र सरकारचे लोकहितकारी निर्णय यांच्या बळावर ही निवडणूक प्रचंड मताधिक्यासह जिंकू असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. निवडुन देऊ सुधीरभाऊना हा अमुचा निर्धार , या मातीच्या सेवेसाठी यावा सुधीरभाऊ या गीतांसह, कार्यकर्त्यांनी दिलेल्या विजयी घोषणांनी संपुर्ण मुल शहर निनादून गेले होते.