*भाजपा व शिवसेना कडून मुख्यधिकारी यांना अनेक समस्या चे निवेदन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – जुन महिन्यात सुरूवात झाली आहे. पण मात्र नगरपरिषद स्वच्छता विभागाकडून अजून पर्यत शहरातील नाल्या सफा झाल्या नाही. १९९१ च्या महापूरानंतर संपूर्ण मोवाड शहर ४०० एकर मध्ये वसल्या गेल. शहातील संपूर्ण नाल्या बांधल्या गेल्या पण न.प. प्रशासनाच्या नियोजना अभावी शहरातील फक्त मुख्य नाल्याची सफाई झाली असून बाकी नाल्या सफा झाले नाही. शहरातील नाल्या सफा न झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात डास झाले आहे. या डांसामुळे शहरात मलेरीया व डेंगू ची लागण होण्याची भिती निर्माण झाली आहे.
जर नाल्या साफा न झाल्यास व मुसळधार पाऊस आल्यास शहरातील खालच्या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरेल व त्या मुळे त्यांचे मोठे नुकसान होईल.
शहरात दररोज न.प कडून झाडझुड केली जाते. व तो कचरा पुन्हा नाल्यात ताकला जातो. याचे मुळे शहरातील आठवडी बाजारातील पूर्ण नाल्या चोक अप झाल्या आहे. नाल्या चोक अप असल्याने पावसाचे पाणी नाली मधून न वाहता थेट रस्त्यावरून वाहते. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यातून गाड्या चालवाव्या लागतात.
शहरातील आठवडी बाजारातील सार्वजनिक संडासात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याठिकाणी नागरिकांना लघवी करायला जातांनी घाणीचा त्रास सहण करावा लागत आहे.
शहरातील गांजर गवत जस्याच तसे
शहरात पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात गांजर गवत निघालेल आहे. त्या गांजर गवताला नगरपरिषदे कडून कापल्या सुध्दा गेले नाही. आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून नव्याने निघाले आहे. त्या गवताने पुन्हा शहर हिरवेगार झाले आहे. त्यामुळे शहरात सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात निघत आहे.
शहरात लाखो रुपये स्वच्छतेच्या नावावर खर्च केल्याजाते पण मात्र शहरात कुठेच स्वच्छता दिसून येत नाही. शहरात प्रशासकीय राजवड असल्याने नागरिकांची दिशाभुल केली जात आहे. अध्यक्ष , उपाध्यक्ष ,नगरसेवक नसल्याने न.प. कर्मचाऱ्यांना कुणाचे अभय नाही अशी अवस्था झाली आहे.
शहरातील अनेक स्टेट लाईट बंद
पावसाळ्याला सुरुवात झाली असून शहरातील २५ % पेक्षा जास्त पथदिवे बंद पडली आहे. नागरीकांनी अनेकदा सांगून सुध्दा पथदिवे लावल्या गेले नाही. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी शहरात मोठ्या प्रमाणात निघतात .त्यामुळे अंधारात सरपटनारे प्राणी दिसून पडत नाही. त्यामुळे नागरिकांनी पथदिवे लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे.
मुख्यधिकारी पल्लवी राऊत यांना निवेदन देऊन मोवाड शहरातील कामांवर लक्ष वेधले आहे. शहरात गंजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील सर्व उद्याने गांजर गवताने भरलेली आहे. शहरातील नाल्या स्वच्छ नाही. शहरातील २५ टक्के पथदिवे बंद आहे तर बाजारातील सर्व शासकीय मुतारी खराब झाल्या आहे. शहरातील नाल्या साफ नसल्याने डासांचे प्रमाण मोठ्याया प्रमाणात वाढले आहे. वाढलेल्या डासामुळे शहरात डेंगू ची लक्षणे येऊ शकतात. शहरातील नाल्यात लवकरात लवकर मलेरीयाची फवारणी करण्यात यावी. तसेच स्मशान भुमी मधील गांजर गवताची
स्वच्छता ,पाणेची कायम स्वरूपी व्यवस्था या सर्व कामावर मुख्यधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे निवेदन देते वेळी उपस्थित भाजपा चे पदाधिकारी ईसमाईल बारुदवाले,दिनेश पांडे,रवींद्र माळोदे,नंदकिशोर काबडे,चेतन ठोबरे ,पत्रकार श्रीकांत मालधुरे, शिवसेना चे ललित खंडेलवाल यांनी निवेदन दिले.