*वामनराव चटप यांचा राजुरा विधानसभा क्षेत्रातुन उमेदवारी अर्ज दाखल*

*वामनराव चटप यांचा राजुरा विधानसभा क्षेत्रातुन उमेदवारी अर्ज दाखल*


*आवारपूर  :-गौतम धोटे.*

राजुराःअ‍ॅड. वामनराव चटप यांनी राजुरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल क..रताना युवकांची व महिलांची विशेष उपस्थिती होती. जीवती, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी या तालुक्यातून हजारो लोक आज वामनरावांच्या अर्ज भरण्यासाठी सहभागी झाले होते. वामनराव चटप यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शन नंतर विरोधकांची धाकधुक आता वाढली आहे आणि राजुरा विधानसभेचे वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण ,शेतमालाला रास्त भाव व कर्जमुक्ती आणि सोबतच कामगारांच्या योग्य वेतनाचा प्रश्न हा माझा विधानसभा निवडणुकीचा निवडणुकीतील प्रमुख अजेंडा असेल असे वामनराव चटप यांनी सांगितले .


भवानी माता मंदिर राजुरा येथून या पदयात्रेची सुरुवात झाली . तर तहसील कार्यालय राजुरा इथपर्यंत ही पदयात्रा होती. या पदयात्रेत झालेल्या मोठ्या उपस्थितीमुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज भरत असताना ज्येष्ठ विदर्भवादी नेते राम नेवले, अमरावती येथील रंजना मामुर्दे, अरुण पाटील नवले , निलकंठ कोरांगे, प्रभाकरजी दिवे इत्यादी नेत्यांचा सहभाग होता.


*विशेष म्हणजे चारही तालुक्यातुन यावेळी १०,००० हुन अधिक लोक उपस्थित होते.
हे खरे ..

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …