*वेकोलि कामठी उपक्षेत्राने जागा देऊन नागरिकां ना स्थानतंरित करावे. – माजी खासदार जाधव*
*चार नंबर, कवेलु घर, बांधा दफाई च्या नागरिकांचे पुनर्वसन करा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान च्या कर्मचाऱ्यांची मोल मजुरी करून उपजिविका करण्याऱ्या नागरिक मागील ५० वर्षापासुन वेकोलि च्या जागेत वस्ती करून राहत असल्याने कोळसा उत्खनन करण्याकरिता चार नंबर, कवेलु घर, बांधा दफाई या वस्त्यांच्या नागरिकांना योग्य जागेचे पट्टे व इमला मोहबदला देऊन टेकाडी ग्रामपंचायत परिसरात स्थानतंरित करण्यात यावे.
नागपुर जिल्हयात वेकोलि च्या जवळपास १३ कोळसा खाणी असुन कोळसा उत्खनन करतांना या कोळसा खदान च्या कार्यप्रणाली ही परिसरातील नागरिकांच्या दुष्टीने व्यवस्थित नसल्याने पाणी, वायु व जमिनीचे प्रदुर्शन मोठया प्रमाणात होत आहे. वेकोलि खुली कोळसा खदानचे दुषित पाणि कुठलिही प्रकिया न करता नागपुर जिल्हयाची जिवनदायी कन्हान नदीत सरळ सोडुन दुषित करण्यात येत असल्याने कन्हान नदी परिसरातील कोळसा खदान च्या पाणी, वायु व जमिनीचे प्रदुषणा मुळे आरोग्यावर विपरित परिणाम कित्येक लोकांचे दमा, कँन्सर अश्या दुर्धर आजाराने बळी जात असल्याने आदिच नागरिक, शेतकरी व व्यावसायीक भयंकर त्रस्त असल्याने वेकोलि प्रशासना विरोधी तिव्र रोष व्याप्त असताना चार नंबर, कवेलु घर, बांधा दफाई च्या नागरिकांचे पुनर्वसन न केल्यास परिसरातील लोकांचा सहनशक्तीचा बांध फुटु नये म्हणुन सोमवार (दि.१२) जुलै २०२१ ला रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मा. प्रकाश जाधव हयांनी वेकोलि कामठी उपक्षेत्र प्रबंधक विनय कुमार हयाना भेटुन चर्चा करून आपल्या कार्यक्षेत्रातील वेकोलि कामठी व इंदर खुली कोळसा खदान च्या मध्यतंरी चार नंबर, कवेलु व बांधा दफाई येथे वेकोलि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घर कामे, मोलमजुरी व इतर आवश्यक हात मजुरीची कामे करित वेकोलि च्या जागेवर झोपडया, कच्चे, पक्के घरे बांधुन मागील ५० वर्ष व कित्येक वर्षा पासुन स्थायिक झाले आहे. वेकोलि ला कोळसा उत्खनन करण्याकरिता या वस्त्या हटविणे भाग आहे. परंतु महाराष्ट्र शासन नियमानुसार प्रकल्प ग्रस्ताचे पुर्वसन करित असताना त्यांच्या अवलंबुन असणाऱ्या बारा बलुतेदार सुध्दा सरकारी जागेवर झुग्गी झोपडी, कच्चे पक्के घरे बाधुन उपजिविका करणाऱ्या गरिब गरजु नागरिकांना सुध्दा जमिनीचे पट्टे व मोहबदला देऊन त्यांचे सुध्दा पुनर्वसन करण्यात येते. उदा. नागपुर जिल्हयातील गोसीखुर्द, सातगाव, बुट्टीबोरी, एमआयडीसी येथील पुनर्वसन. यानुसार वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत वेकोलि जागेवर मागील ५० वर्ष व कित्येक वर्षापासुन ४ नंबर, कवेलु घर शिवमंदीर वस्ती , बांधा दफाई चे नागरिक लोकवस्ती करित असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार वेकोलि ने या घरांचा सर्वे करून टेकाडी ग्राम पंचायत परिसरात दुसरी कडे जागा उपलब्ध करून योग्य पट्टे व मोहबदला देऊन स्थानतंरित करण्यात यावे असे संबोधित करून मागणी करण्यात आली. या प्रसंगी माजी खासदार मा. प्रकाश जाधव, टेकाडी ग्रामपंचायत सरपंचा सुनिता मेश्राम, मोतीराम राहटे, दिलीप राईकवार, गणेश भोंगाडे, कमलसिंग यादव वेकोलि अधिकारी महाराणा, सुरक्षा अधिकारी संतोष यादव सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.