*कांन्द्री येथुन चारचाकी सुमो वाहन चोरी*
*फिर्यादी च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत चोऱ्यांचा गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत होत असुन कांन्द्री येथे एका अज्ञात आरोपीने चारचाकी सुमो वाहन चोरी केल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक.१३ जुलै २०२१ ला रात्री २:३२ वाजता च्या सुमारास फिर्यादी राजेश शर्मा वय ४४ वर्ष राहणार. कांन्द्री हा रात्री घरी झोपला असता कुणीतरी अज्ञात आरोपीने यांचा फायदा उचलुन घरा समोर ठेवलेली चारचाकी टाटा सुमो वाहन क्रमांक एम एच ३१ एफ सी ३२४५ किंमत २,५०,००० रुपया ची चारचाकी वाहन चोरून नेले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी राजेश शर्मा सकाळी उठुन घरा बाहेर समोर येऊन पाहतो तर चारचाकी सुमो वाहन न दिसल्याने फिर्यांदी यांनी या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळावर पोहचुन सीसीटीवी कैमरे ची पाहणी केली. सदर प्रकरणी फिर्यादी राजेश शर्मा यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २५०/२०२१ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून सीसीटीवी कैमरे च्या मदतीने आरोपीचा शोध सुरु केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमितकुमार आत्राम हे करित आहे.