*रस्त्यावरील श्वानाला बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल*

*रस्त्यावरील श्वानाला बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

नागपुर:- मानवाप्रमाणेच रस्त्यावर वावरणाऱ्या मोकाट प्राण्यांना सुद्धा स्वतंत्रेचा संवैधानिक अधिकार आहे. रस्त्यावरील प्राण्यांसाठी अन्न-पाणी-आश्रय व इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून देखील जणू काही याचा सर्वांनाच विसर पडलेला आहे. पशुप्रेमी अथवा सामान्य व्यक्ती आपल्या संविधानिक अधिकारांचे निर्वाहन करून रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न-पाणी उपलब्ध करून देऊ शकतात याबाबत सुप्रीम कोर्टाने दिशानिर्देश सुद्धा जारी केले आहेत. श्वानांच्या सरक्षणांसाठी सुद्धा कायदे अमलात आहेत म्हणून प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध तसेच पशुप्रेमींवर देखील अत्याचार झाल्यास पोलीस विभाग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करू शकते.


शहरात दिवसेंदिवस पशुक्रूरतेच्या घटना वाढतच आहेत. दि. 18-06-2021 ला नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पोतदार शाळेमागील यश नगर परिसरातील इसामाने रस्त्यावरील 3 महिन्याच्या पिल्याला क्रूरतेने मारहाण करून जवळच्या परिसरात फेकून दिल्याची माहिती पशुप्रेमी दीपिका उमक यांना रात्रीच्या सुमारास कळताच पशुप्रेमी ने घटनास्थळी धाव घेऊन वेदनेने विव्हळणाऱ्या त्या जख्मी पिल्याला आपल्या घरी आणले.
दीपिका उमक यांनी दुसऱ्या दिवशी श्वानाला घेऊन जवळच्या पशुचिकित्सक कडे पाचारण केले असता उपचारादरम्यान X-RAY काढल्यावर व्हेटनरी डॉक्टर यांनी सांगितले की श्वानाच्या मागच्या व समोरच्या पायांचे हाड तुटलेले आहे त्यामुळे श्वान चालण्यास असमर्थ आहे. म्हणून डॉक्टर ने लगेच त्या श्वानाच्या दोन्ही पायाला प्लास्टर लावले.
असे क्रूर कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायद्याने कठोर कार्यवाही करण्यात यावी म्हणून पशुक्रूरतेच्या ह्या संपुर्ण घटनेची माहिती समाज माध्यमांवर टाकण्यात आली होती त्यामुळे सदर प्रकरण पशुपक्ष्यांच्या हक्कासाठी व पर्यावरणाच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्या पशुप्रेमी स्वप्नील बोधाने यांच्याकडे पोहचले. स्वप्नील बोधाने यांनी घटनेविषयी संपूर्ण माहिती घेऊन R.A.D संस्थेचे अध्यक्ष राजेशजी दोशी व दीपिका उमक यांच्यासह हुडकेश्वर पोलीस स्टेशन गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.भोसले यांची भेट घेऊन प्रकरणाचे गांभिर्य सांगितले त्यामुळे अखेर दि. 03-07-2021 ला पोलीस कर्मचाऱ्यांनी घटास्थळाचा पंचनामा करून श्वानाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर IPC 428 व पशुक्रूरता निवारण अधिनियम 1960 नुसार 11 (1)(c) अंतर्गत FIR दाखल केली.

पर्यावरणप्रेमी स्वप्नील बोधाने सांगतात की, रस्त्यावरील बेघर कुत्र्यांना व इतर पशुपक्ष्यांना सुध्दा कायद्याने संरक्षण प्राप्त आहे म्हणून त्यांना दगड मारणे, काठी मारणे, जख्मी करणे, विष देणे, हत्या करणे, स्वस्थ श्वानांना जबराईने पकडवून दुसरीकडे सोडणे अथवा जंगलात स्थलांतरित करणे, त्यांना पळवून लावणे, पाळीव प्राण्यांवर अत्याधिक ओझे लादणे, पाळीव प्राण्यांची उचित काळजी न घेणे, गौतस्करी, अवैध श्वान ब्रिडिंग, रस्त्यावरील कुत्र्यांवर अत्याचार करणे अशी प्रकरणें समोर आल्यास पोलीस विभाग पशुप्रेमींच्या लेखी तक्रारींवर भारतीय दंड संहिता, पशुक्रूरता निवारण अधिनियम, महाराष्ट्र् प्राणी संरक्षण कायदा तसेच अन्य कायद्याअंतर्गत FIR दाखल करू शकते…..

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …