*पक्षाचे उपकार कधीही विसरू शकत नाही…*

*पक्षाचे उपकार कधीही विसरू शकत नाही…*

*पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले*

*नामांकनाच्या शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची अधिकु्त उमेदवारी मीळेल अशी संभावना असतांना एकदम शेवटच्या क्षणाला टेकचंद सावरकर यांना भारतीय जनता पक्षाने आपला अधिकु्त उमेदवार घोषित केल्याने कामठी विधानसभा क्षेत्राचे विद्देमान आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री व उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते मंडळीवर जणूकाही वज्रघातच झाला. एनवेळेवर आकस्मिक घडलेल्या याप्रकारे मुळे कार्यकर्ते संतप्त होणेही अपेक्षीत होते व कार्यकर्त्यांनी उद्रेक करण्यास सुरुवात ही केली परंतू इतक्या सर्व घडामोडींतून स्वताला सावरत आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढून आपलच काही चुकलं असेल असा विश्वास करत पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुण पार्टीसाठी एक कार्यकर्ता म्हणून सदैव कार्य करण्याची आपली तयारी व संस्कृती असल्याचे बोलून दाखवीले*

*पक्षाने मला खुपकाही दिले*

*माझ्या सारख्या एका सामान्य आॅटो चालकाला जि.प. सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाºया, किराणा दुकानात काम करणाºया मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते, खर्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.*

*कामठी विधानसभा मतदार संघासाठी भाजपने यावेळी आपल्याला संधी नाकारली, याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्षाने मला याच मतदार संघातून तीनवेळा आमदार केले. दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले. पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. मी विदर्भात पक्षासाठी काम करावे अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही. काटोल हा माझ्यासाठी पर्याय होता. मात्र मी तिथून लढलो असतो तर तेथील कार्यकर्त्यावर अन्याय झाला असता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला माझ्या मोठ्या भावासारखे तर नितीन गडकरी वडीलांसारखे आहेत. त्यांच्या नेतृत्वात मला काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढेही मी काम करीत राहणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.*

*पूर्व विदर्भात विधानसभा निवडणुकीत मला काम करता येईल, त्यामुळे मला पक्षाने उमेदवारी दिली नाही. माझ्या पत्नीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला नाही, त्याला एबी फार्म नसल्यामुळे तो तसाही बाद होणारच होता, असेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.*


*चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्यातील इतर विधानसभा क्षेत्रावर तर पडणार नाही,पडला तर कितपत पडणार असे विवेचन सद्याच्या घडीला सुरु असले तरी दि.21आक्टोंबर चे मतदान व दि 24 आकँटोंबर च्या मत मोजनीतून हे निश्पन्नास येणार की बावनकुळे यांना उमेदवारी न दिल्यामुळे कीतपत नुकसान होते.परंतू एनवेळी तिकिट नाकरुन पक्षश्रेष्ठींचा काय छुपा गेम आहे हे कळायलां आजून वेळ आहे…*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …