*शेतात काम करते वेळी साँपापासून सतर्क राहा* *सर्प मित्रांचे आव्हान*

*शेतात काम करते वेळी साँपापासून सतर्क राहा*

*सर्प मित्रांचे आव्हान*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेरः पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरु होणाऱ्या काळात बऱ्याच प्रजातीच्या सपांचा प्रज्वलन काळ असतो आणि याच दिवसांमंध्ये सापची पिल्लं जन्म घेतात आणि आसपास परिसरात पसरतात आज शेतामंध्ये निंदन,खुरपणीचे कामे सुरु आहेत.शेतात काम करत असताना शेतकरी शेतमजूर तसेच घरापरिसातील साफसफाई करतेवेळी विशेष सावधानी बाळगण्याची आवश्यकता आहे*

*एकाच दिवशी चौघांना सापाचा चावा*

*सध्यास्थितीत शेती हंगाम सुरु असुन शेतीत निंदन-खुरपणी आदी कार्य सुरु असुन तालुक्यात विविध ठीकाणावर एकाच दिवशी चार लोकांना सर्पाने चावा घेण्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला . भावना ढोबळे वय 22वर्ष रा. वाडचिंचोली,2 सिंधूबाई जुनघरे वय 31 वर्ष रा. पानउबाळी, सीमाबाई गावन्डे वय 28 वर्ष रा. वाकी,गुलाबरावजी चाचाने वय 55वर्ष राहणे उमरी यांना घोणस जातीचा विषारी सापाने दंश केल्याचे उघडकीस आले*

*पीडितांना प्राथमिक उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुण पुढील उपचारासाठी मेडिकल हाँस्पीटल नागपुर येथे रवाना करण्यात आले*

*शेतात काम करीत असतानी विशेषतः निंदन,खुरपण अथवा शेतीची सफाई करताना अधिक सावधगिरी व काळजी घेणे गरजेचे आहे असे सर्पमींत्राचे मत आहे.शेतात काडी,कचरा,पाला पाचोळा असलेल्या ठिकाणी साप आढळून येतात.सोबतच साँपांचा तसेच पाला पाचोळा व मातीचा रंग सारखाच असल्याने झाडाखाली अथवा पाचोळ्यात लपलेला सापाला ओळखणे अवघड असते म्हणून सर्वांनी सावधगिरी बाळगावी तसेच साँप दिसल्यानंतर घाबरून न जाता सर्पमित्राला संपर्क साधावा किंवा वनविभागाला याची सूचना द्यावी व ते येई पर्यंत साँपकडे लक्ष ठेवावे.*


*साप चावल्यानंतर घाबरून न जाता धीर धाराव आणि कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडून कोणत्याही तांत्रिक मांत्रिकाकडे जाऊ नये, त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात पोहचुण योग्य उपचार घेत आपल्या जिवीतेचे संरक्षण करावे अशी विनंती सर्पमींत्र घनश्याम तुर्के,अजय पटेल यांनी केली असुन सावनेर तालुक्यात कार्यरत सर्पमित्र 1) घनश्याम तुर्के,2)अजय पटेल,3)मोहित बारस्कर,4)सुरज तभाने,5)संकेत गमे,6)आकाश राऊत, 7)अक्षय आवारी,अथवा महाराष्ट्र न्युज मीडियाशी संपर्क साधावा*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …