*चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर व्हावा यादृष्टीने सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार – सुधीर मुनगंटीवार*
*महायुतीच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन*
*आवारपूर प्रतिनिधी -गौतम धोटे*
*अर्थमंत्री मुनगंटीवार यांची पत्र परिषद*
आवारपूर:- गेल्या 50 वर्षात चंद्रपूर जिल्हयाच्या विकासासाठी जेवढा निधी उपलब्ध झाला नाही तेवढा निधी आम्ही या 5 वर्षाच्या काळात उपलब्ध केला. सिंचनाच्या क्षेत्रात सुध्दा या जिल्हयाने लक्षणीय प्रगती केली आहे. पुढील 5 वर्षात हा जिल्हा पाणीदार व्हावा यादृष्टीने आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार आहोत. महिला बचतगटाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. हा जिल्हा विकासाच्या मार्गात्रवर अग्रेसर व्हावा यादृष्टीने आम्ही सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू असे सांगत या विधानसभा निवडणूकीत चंद्रपूर जिल्हयातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दिनांक 5 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, रिपाईचे सिध्दार्थ पथाडे, जयप्रकाश कांबळे, सुरेश पचारे, डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहूल पावडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही निवडणूक विचारांची आहे, विकासाची आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ होईल यात तिळमात्रही शंका नाही. गेल्या 5 वर्षात या जिल्हयात विकासाची लक्षणीय कामे झाली. धानोरा, तेलवासा, आमडी या बॅरेजेसला मंजूरी मिळाली आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प पूर्ण झाला आहे. पुढील 5 वर्षात या जिल्हयातील 15 ही तालुके पाणीदार व्हावे यासाठी बंधारे, कॅनल्स चे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. रमाई घरकुल योजना, शबरी योजना, पंतप्रधान आवास योजना या माध्यमातुन नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. पुढील 5 वर्षात जिल्हयात एकही जण बेघर राहणार नाही हा आमचा संकल्प आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठे कॉटन क्लस्टर उभारण्याचे आपले नियोजन आहे. पुढील 5 वर्षात आवाज दो ही योजना आपण सुरू करणार असून ज्या माध्यमातुन सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचतील. प्रत्येक तालुक्यात स्टेडियम चे बांधकाम करण्यात येईल. मिशन शक्ती अंतर्गत सहा स्टेडियम बांधकामाला मंजूरी मिळालेली आहे. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे उडडाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. महाकाली मंदीर परिसर विकासासाठी 65 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक विकसित जिल्हा ठरावा यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करू, असेही ते म्हणाले.