*कन्हान ला एका युवकास तिन युवकांनी केले मारहाण*
*फिर्यादी च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पटेल नगर शितला माता मंदिर जवळ तीन युवकांनी बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या संशया वरून दंड्याने व हातबुक्या ने मारहाण केल्याने शुभम वंजारी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी तीनही युवका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.१३ जुलै २०२१ सायंकाळी ७ वाजता च्या दरम्यान शुभम क्रिष्णा वंजारी वय २५ वर्ष राहणार पटेल नगर कन्हान हा काही कामा निमित्य तारसा रोड कन्हान येथे गेला असता त्याचा काकाचा मुलागा अतुल याने फोन करून सांगितले कि विक्रम तिवाडे हा काही लोकांसोबत तुझ्या घराकडे आला आहे आणि तो तुझे नाव घेऊन शितला माता मंदिरा जवळ शिवीगाळ करीत आहे. यामुळे शुभम तारसा चौक येथुन लगेच आपल्या घराकडे शितला माता मंदिर जवळ आला असता तेथे काकाचा मुलगा अतुल भेटला, त्यांनी सांगितले की, विक्रम तिवाडे हा तुला शोधत आहे. तो आताच येथुन निघुन गेला. असे सांगत असतानाच शुभम च्या समोर १) विक्रम तिवाडे वय २५ वर्ष, २) हरीष तिवाडे वय २२ वर्ष, ३) कुणाल तिवाडे वय २० वर्ष तिघे ही राहणार. दुर्गा माता मंदिर चौक पिपरी कन्हान हे तेथे मोटार सायकल थांबवुन शुभम ला हर्षल तिवाडे यांनी म्हटले कि तुला आधीच मी समजाविले होते कि माझ्या बहिणी पासुन दुर राहा . तेव्हा शुभम ने हर्षल तिवाडे याला म्हटले की माझे तुझ्या बहिणी सोबत कुठलिही बोल चाल नाही, असे म्हणताच विक्रम तिवाडे ने शिवीगाळ करित म्हणाला की तुने माझ्या बहिणी ला पळवुन नेले म्हणत हातात लाखडी दंडा घेतला आणि कुणाल तिवाडे याने मला मागुन पकडुन विक्रम तिवाडे ने पावड्याचा लाखडी दांड्याने डाव्या पायावर मारले तसेच हर्षल तिवाडे ने गालावर हातबुक्क्याने मारल्याने शुभम खाली पडला असता परत विक्रम तिवाडे, हर्षल तिवाडे व कुणाल तिवाडे या तिघांनी लाता बुक्यानी मारहण करत असतांना शुभम च्या काकाचा मुलगा अतुल, राहुल व काका दुर्योधन वंजारी यांनी येऊन भांडण सोडविले असता तिघेही तिथुन आपली मोटार सायकल घेऊन जातांना शुभम ला जिवानिशी मारण्याची धमकी देऊन निघुन गेले. सदर प्रकरणा बाबत फिर्यादी शुभम क्रिष्णा वंजारी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी तीनही संशयीत आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक . २६२/२०२१ कलम ३२४, २९४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.