*कामठी येथे भीषण अपघात दोघांचा मृत्यु* *आरोपी ट्रक चालका विरुद्ध कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

*कामठी येथे भीषण अपघात दोघांचा मृत्यु*

 

*आरोपी ट्रक चालका विरुद्ध कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

कन्हान / कामठी प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत जयस्तंभ चौक येथे ट्रक व बाईक मध्ये भीषण अपघात झाल्याने एक युवक व एक युवती चा घटनास्थळी मृत्यु झाल्याने फिर्यादी मृतक युवकांचे वडील यांच्या तक्रारी वरुन आरोपी ट्रक चालक याला कामठी पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक १९ जुलै २०२१ ला दुपारी ०१:०० वाजता च्या दरम्यान मृतक वैभव सुरेश शंभरकर वय २४ वर्ष राहणार काशी नगर नागपुर हा आपली दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४९ डब्लु ६५६८ व त्याची फ्रेंन्ड मोहीनी कृष्ण बिहारी तीवारी वय १८ वर्ष राहणार मोतीबाग नागपूर
हे दोघे ही घुमायला जात असतांना कामठी जयस्तंभ चौक येथे दुचाकी वाहन च्या समोर जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ४० बीएल ७४४४ ला ओव्हर टेक करुन समोर जात असतांना डिवाइडर मधात असल्याने मृतक वैभव याला आपल्या दुचाकी वाहनाची स्पीड कमी करावा लागल्याने त्याचा संतुलन बिगड़ल्याने दोघांना ही ट्रक च्या मागील चाकात धडक बसल्याने दोघांचा मृत्यु झाला . सदर प्रकरणी मृतक युवकांचे वडील फिर्यादी सुरेश शंभरकर वय ५६ वर्ष राहणार काशी नगर , नागपुर यांच्या तक्रारी वरुन कामठी पोलीसांनी ट्रक व आरोपी ट्रक चालक सोनु मानिक सहारे वय ५६ वर्ष राहणार येरखेडा , कामठी याला ताब्यात घेऊन त्याचा विरुद्ध कलम २७९ , ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात कामठी पोलीस करीत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …