*रा.सू.बिडकर महाविद्यालयात चाललेल्या भोंगळ कारभाराची समिती नेमून चौकशी करा- जय जवान जय किसान संघटनेची मागणी*

*रा.सू.बिडकर महाविद्यालयात चाललेल्या भोंगळ कारभाराची समिती नेमून चौकशी करा- जय जवान जय किसान संघटनेची मागणी*

 

हिगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट:- शहरातील मुख्य असलेले शासन मान्य शिक्षण संस्था रा.सू.बिडकर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे मात्र हिंगणघाट सारख्या विदर्भातील सर्वात मोठी तहसील असणाऱ्या शहरात एकमेव महाविद्यालय आहे.या भागात उच्च शिक्षणाकरिता एकही अभियांत्रिकी,वैद्यकीय, तंत्रविद्यानिकेतन सारख्या शिक्षणाकरिता सोय नाही त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना नागपूर,वर्धा,पुणे सारख्या शहरात शिक्षणाकरिता जावे लागते जे सर्व सामान्य नागरिकांना न परवडणारे असून नाईलाजाने रा. सू.बिडकर महाविद्यालयात प्रवेश घ्यावे लागते मात्र या शिक्षण संस्थेमध्ये सर्वत्र भोंगळ कारभार असून महाविद्यालयाच्या फी बाबत,परीक्षा शुल्क,बांधकाम,प्राध्यापकांच्या विद्यावाचस्पती पदवी,निवृत्तीवेतन या बाबत अनेकशे तक्रार तसेच घोटाळे उघडकीस आले आहे.या महाविद्यालय संदर्भात अनेक तक्रारी तसेच भ्रष्टाचाराचे मोठे आरोप देखील झाले आहे त्याच बरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड सुद्धा या महाविद्यालयात झाली असून या महाविद्यालयावर कारवाई करण्यात आली मात्र त्या कारवाईला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला असून कुठलीच कारवाई अद्याप विद्यापीठा कडून झाली नाही तसेच या महाविद्यालयाला शासन मान्यता मंजूर असून सुद्धा कोणतीच माहिती अधिकारा अंतर्गत माहिती दिल्या जात नाही.करिता या संस्थेची समिती नेमून चौकशी करावी व यामधील असलेला भोंगळ कारभार तसेच भ्रष्टाचार उघडकीस आणून कारवाई करावी अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश बोरीकर यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री. भगतसिंग कोश्यारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केली असून सदर महाविद्यालयाची तसेच संस्थेची चौकशी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.आकाश बोरीकर,तालुका उपाध्यक्ष अक्षय वानखेडे,कुंदन सती,अभिजीत मानकर,अमोल तडस,अमित तुराळे आदी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …