गडचांदूर पोलिसांकडून एका दारुविक्रेत्याला अटक

 

गडचांदूर पोलिसांकडून एका दारुविक्रेत्याला अटक.


*आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे*

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्याप्रमाणात अवैध दारुविक्री होताना दिसत आहे.पोलिसांकडून सतत कारवाया सुरु असतानाच याच श्रेणीत 5 सप्टेंबर रोजी गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांना गुप्त माहिती मिळाली की, येथील पेट्रोल पंप चौकात एक इसम दारुविक्री करत आहे.त्वरित सुत्र हलवून आरोपीला अटक करण्यात आली.सुनील देवाळकर असे आरोपीचे नाव असून त्याच्या जवळ आणि घराची झडती दरम्यान विदेशी कंपनीच्या एकुण 24 बाटला जप्त करून सदर आरोपीवर दारुबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.सदर कारवाई ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अर्वींदकुमार जगने,एएसआय बोरीकर,अमर राठोडसह इतर पोलिसांनी केली.पदभार सांभाळताच येथील अवैध धंद्यांवर अंकुश लागायला सुरुवात केल्याबद्दल नागरिकांनी ठाणेदार भारती यांचे कौतुक केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …