*मोठी बातमी*
*शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे पाप,प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नावजलेल्या राष्ट्र विकास शिक्षण संस्था व्दारे संचालित डॉ.हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार दि.22 जुलै 2021 रोजी सायंकाळी 7-30 च्या दरम्यान आरोपी विरेंद्र केशव जुमडे वय वर्ष 55 रा नागपुर याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली.
घटनेतील हकिकत अश्याप्रकारे की 15 वर्षीय अल्पवयीन पीडिता सायंकाळी 7-30 चे दरम्यान आपल्या घराच्या आंगणात बसुन टिव्ही पाहत असतांना डॉ.हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य असलेला आरोपी विरेंद्र केशव जुमडे वय 55 हा दारुच्या नशेत पीडितेच्या घरी पोहचुण पीडितेचा हात पकडून तीचा विनयभंग करु लागला असता घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने आराडाओरड केली असता आरोपीने परिसरातील नागरिकांना आपल्या पदाचा धाक देत धमकावू लागला.सदर घटनेची माहीती पीडिता व तीच्या परिवाराने सावनेर पोलीसांना देऊन सदर घटनेची तक्रार नोंदवली.
पीडितेच्या तोंडी तक्रारीवरून भादवी 1860 चे कलम 354,504 तसेच बाल लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 112 कलम 8 व 12 नुसार पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी गुन्ह्याची नोंद करुण प्रकरण तपासात घेतले आहे.
आरोपी विरेंद्र केशव जुमडे हे डॉ.हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय सावनेर येथे प्राचार्य पदावर कार्यरत असुन शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीने अश्याप्रकारचे गैरकु्त्य करुण अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पवित्र अश्या समझल्या जाणार्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असुन अश्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी असे पीडित परिवारासह शिक्षण क्षेत्रातील जानकारांचे मागणी आहे.
आरोपी विरेंद्र केशव जुमडे यास तात्काळ अटक करण्यात आली असुन न्यायालयात हजर करुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारूती मुळूक यांचे नेतृत्वात सहयक पोलीस निरिक्षक सोनाली रासकर करत आहे.
आरोपी विरेंद्र केशव जुमडे यांचेवर यापूर्वीही अधिनस्थ महिला कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचे आरोप असुन सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याची खात्रीपूर्वक माहीती उघडकीस येत असुन पीडिता ही अल्पवयीन असुन आदिवासी समाजाची असल्याचे वु्त्त आहे.