*गाढवाच्या गळ्यात फलक बांधुन, बेशरम ची झाडे घेऊन संभाजी ब्रिगेड चे नगरपरिषदेवर धडक आंदोलन*
*आधी जनतेची काम करा नाहीतर खुर्ची खाली करा..!*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – शहरामध्ये भुयारी गटार लाईन चे काम सुरू होते मात्र पावसाळा लागूनही ते काम पूर्णत्वास गेले नाही. शहरातील सर्वच वॉर्डातील रस्ते हे चिखलमय झाले असून. स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
2) अनेक रस्त्यांवर मुरूम टाकला गेला नसून रस्त्यांवर चिखलच चिखल बघायला मिळतोय. नागरिकांना पायी चालताना ही प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
3) रस्त्यावर पसरलेली माती वॉर्डातील नात्यांमध्ये फसून पाणी जायला जागा होत नाही आहे. सर्वत्र परिसरात घाण साचत असून डेंग्यू ची मच्छर तयार झालेली आहे.
4) एलआईजी कॉलनी मध्ये पाण्याच्या टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून संबंधित परिसर चिखलमय झाला असून विषारी झुडूप आणि डास तयार झाले आहेत.
इतकं सगळं असून सुद्धा प्रशासन मात्र या प्रकरणात गांभीर्याने काम करताना दिसून येत नाही.
आर्वीतील या समस्येच्या विरोधात आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. पुढील 7 दिवसात काम पूर्णत्वास गेले नाही तर आणखी उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल अशा प्रकारचा इशारा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षिरसागर यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष रोहन हिवाळे,रवी घाडगे,नरेश निनावे, शुभम राजे, गणेश चाफले,महिला आघाडी अध्यक्षा अर्चना चाफले, गणेश पंधराम,निखिल लंगडे,आकाश सौदागर ,वैभव करपे,प्रियांका गुजर,ज्योती जाधव,किरण गोरे,पल्लवी केदार,पूनम मैदानकर,सविता चतुरकर, सपना दळवी,सोनाली बडे,तायवाडे, कविता असोले,मंगेश निखाडे,यश कातोडे,गणेश शेळके,पवन भोम्बेकर, हर्षल कदम,लतेश शिरभाते,पियुष मेन्द्रे, वीर कठाने,निलेश घुगरे, अर्षद राही,शुभम गोसावी,ज्ञानेश्वर पोहरकर, हर्षल कदम,रोशन गोमासे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.