*नालीचे अपुर्ण काम पुर्ण करुन देण्याची मागणी*
*कांन्द्री ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांचे प्रकल्प संचालकांना पत्र*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांन्द्री ग्रामपंचायत च्या हद्दी मध्ये राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या विस्तारीकरणाचे काम केले असुन नालीचे काम अपुर्ण असल्यामुळे नाली मधील सांडपानी वाहन नसल्याने कांन्द्री ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी व सरपंच बलवंत पडोळे यांनी प्रकल्प संचालकांना एक पत्र देऊन नालीचे अपुर्ण काम पुर्ण करुन देण्याची मागणी केली आहे .
कांन्द्री ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ५ राष्ट्रीय महामार्ग ४४ ला लागुन असलेल्या महाराजा बार जवळ अर्धवट नाली बांधकाम केले असुन समोर गावातील सांडपाणी वाहुन जाणेकरीता मोठा नाला असुन त्या नाल्यापर्यंत सदर नालीचे बांधकाम करणे अपेक्षित होते . परंतु हे काम अपुर्ण असल्यामुळे नाली मधील सांडपानी वाहन नाही आहे . तसेच फौजी बार ते नवलकिशोर गुप्ता यांचे घरापर्यंत नालीचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याने सदर नालीचे बांधकाम पुर्ण करण्याकरिता कांन्द्री ग्रामपंचायत च्या प्रशासनाने प्रकल्प संचालकांना पत्र दिल्या वर ही नालीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले नसल्याने व अर्धवट बांधकामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर रात्रीचे वेळी अपघात होऊन जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर नालीचे अपुर्ण काम पुर्ण करुन देण्याची मागणी कांन्द्री ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी व सरपंच बलवंत पडोळे यांनी प्रकल्प संचालकांना एक पत्र देऊन केली आहे .