*कन्या पुजन व शालेयोपयोगी साहित्य वाटप*
*चिमुकल्या विद्यार्थ्यांन सोबत साजरा केला वाढदिवस*
*सुरज सेलकर*
सावनेर– *न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत राजस्थानी महिला मंडळ तर्फे कन्यापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व मुलींना शालेयोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच श्री.गणेश झाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुलांना शालेयोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.*
*शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता गणेश झाडे यांनी मंडळातील सर्व सदस्यांचे स्वागत केलेआणि त्यांच्या या कामाची प्रशंसा केली व अशाच नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमी घ्यावे आणि आमच्या विद्यार्थ्यांना मदत करावी. यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.नरेंद्र चापरे,श्री. सुरेश गजभे,माणिक रामटेके,सौ.राऊत मॅडम,सौ.नर्मदा डवरे,कु.ज्योती कोडापे यांनी धन्यवाद व्यक्त केले.*