*इंद्रधनुष्य युवा महोत्सवात रागीट महाविद्यालयाचे सुयश*
रामटेक– कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे ५ आक्टो.२०१९ ला एक दिवसीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय येथील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची चमु पाठवण्यात आली. त्यात वक्तृत्व,वादविवाद,प्रश्नमंजुषा,संगीत, रांगोळी,रंगमंच ,फाईनआर्ट अशा प्रकारचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेत सहभागी महाविद्यालयातील शुभांगी केवट,आचल मोहणकर, दिशा बगमारे रितु बावनकुळे, दुर्गा ठाकरे, प्राजक्ता वरखेडे या विद्यार्थिनींचा चमूने” मोबाईलचे दुष्परिणाम “या विषयावर मुकनाटयाचे सादरीकरण केले. त्या तृतीय स्थान प्राप्त केले असून” वादविवाद स्पर्धेत “रागीट महाविद्यालयातील बीए प्रथम वर्ष चा विद्यार्थी अनिकेत मैंद यांनीसुद्धा तृतीय स्थान मिळवून महाविद्यालयाच्या यशातभर घातली असून या सर्व गुणवंतांच्या सत्कार कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचे कुलसचिव मा.डॉ. विजयकुमार मेनन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.होले मॅडम डॉ. दिनकर मराठे व छात्र कल्याण समितीचे संचालक डॉ. जयवंत चौधरी यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत रागीट आणि संस्थेच्या अध्यक्षा प्रा. जयश्रीताई देशमुख व विभाग प्रमुख प्रा.दिलीप गिरडे सह इतर प्राध्यापकांना देण्यात आले.