*घरघुती वादात शस्त्राने हल्ला ; एक गंभीर*
विशेष प्रतिनिधि
पाटणसावंगी – पत्नीला सासरी का पाठवत नाही शुल्लक कारणावरून झालेल्या वादात एकाने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एक गंभीर जखमी झाला. घटना बुधवारला सायंकाळी ७वाजताच्या दरम्यान घडली. रामू उर्फ इमरान सुलतान बेग वय २४ रा. बाजार चौक पाटणसावंगी हा जखमी आहे. नासिर शेख मोहम्मद आसिफ रा नागपूर असे घटनेतील आरोपीचे नाव असून त्याला अटक करून ३०७ ,४५२ भादवि अनव्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस तपास निशांत फुलेकर व इतर करीत आहे.