*मोठी बातमी*
*कन्हान येथे एका ईसमा वर चाकुने हल्ला , हालात चिंताजनक*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा रोड येथील एका ढाब्या जवळ काही आरोपींनी सोनु बोरकर या ईसमाच्या फसली वर चाकुने माराहण करुन गंभीर जख्मी केल्याची घटना समोर आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सुत्रांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक ३१ जुलै २०२१ ला रात्री च्या सुमारास गहुहिवरा रोड येथील एका ढाब्या जवळ काही आरोपींन सोबत सोनु बोरकर याच्या काही कारणा वरुन वाद – विवाद झाला . विवाद ऐवढा वाढला कि काही वेळानंतर आरोपी ने घरुन चाकु आणुन सोनु बोरकर याच्या फसली वर चाकुने माराहण करुन त्याला गंभीर जख्मी केले . या घटनेची माहिती येथील नागरिकांनी कन्हान पोलीसांना दिली असता कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन गंभीर अवस्थेत असलेल्या ईसमाला उपचारासाठी कामठी येथील राॅय हाॅस्पिटल मध्ये भर्ती केले असुन हालात चिंताजनक सांगितली जात आहे . तर या घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करत आहे .