*टेकामांडवा येथे रिपाइं (आं) ची बैठक संपन्न*
*भाजपा उमेदवार अॅड. संजयभाऊ धोटे यांना निवडून आणण्यासाठी कमळाचा एकदिलाने प्रचार करणार*
आवारपूर प्रतिनिधि :- गौतम धोटे
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आं) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा. नामदार रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी बिजेपी- रिपाइं ( आं) उमेदवार अॅड. संजयभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन मन धनानी सहकार्य करावे. असे प्रतिपादन रिपाइं ( आं) नागपूर प्रदेश महासचिव तथा भारतीय बौद्ध महासभा विदर्भ प्रदेश अध्यक्ष, चंद्रपूर अशोक घोटेकर यांनी केले. हे टेकामांडवा येथे ( ता. ७ ऑक्टोबर ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आं ) तालुका स्तरीय बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.*
*सदर बैठकीत निवडणूकी संबंधाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत पक्षाचे धेय्य, धोरणे समजावून सांगण्यात आले. मा. नामदार आठवले साहेबांच्या आदेशानुसार मित्र पक्ष असलेल्या भाजप उमेदवार अॅड. संजयभाऊ धोटे यांना सर्वतोपरी निवडून आणण्यासाठी पाठबळ देण्याचे ठरविण्यात आले.*
*सदर बैठकीस चंद्रपूर महानगर अध्यक्ष राजू जंगम, कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, जिवती तालुका अध्यक्ष सुर्यकांत कांबळे, कोरपना तालुका महिला अध्यक्षा प्रिया खाडे, नरेश जावलीकर, जिवती तालुका महासचिव वसंत कांबळे, शिवाजी गायकवाड, अरूण विधाते, देविदास खाडे, सिकंदर कांबळे, माधवराव कोटनाके, महेंद्र कांबळे, किशोर कांबळे, महिला तालुका अध्यक्षा कांबळेताई, शंकर मडावी, पुनागुडा, संतोष भावे, संदीप ढवळे, अशोक बोडके, लक्ष्मण भावे, चिंटू जोंधळे, लालसाव आत्राम, दशवंत आत्राम, रामदास सिरसाट, संजय धाटगीडे, श्रीमंत जोंधळे, जयराम शेडमाके, मोहन येगडे, शेषराव लांडगे, मानिक नगराळे, गौतम वाघमारे, बालाजी कांबळे, शंकर टेकाम, भगवान मसूरे, गौतम कदम, इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.*