*51 फुटाच्या रावणाचे दहन*
*सुनील केदार मित्र परिवाराचे आयोजन*
अलोट गर्दी उसळली
*सुनील केदारांनी उपस्थितीतांना मागीतला आशीर्वाद*
*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले
*सावनेरःअसत्या वर सत्याच्या विजयाचे पर्व म्हणजेच “विजयादशमी दसरा” याप्रसंगी सावनेर शहरातील नरग परिषद हायस्कुल च्या भय पटांगणार सुनील केदार मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 51फुटाचे भव्य रावण दहन करण्यात आले*
*दरवर्षी आमदार सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच हस्ते रावण दहनाचे आयोजन होत असे परंतू विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचार संहिंतेचे काटेकोर पालन करत यावर्षी समाजसेवी मनोज बसवार व विनोद जैन यांच्या हस्ते रावन दहन करण्यात आले.व क्षेत्राचे लाडके आमदार सुनील केदार यांनी दर्शकदिर्घेतुन रावण दहणाचा आस्वाद घेतला हे विशेष…*
*उपस्थित नागरिक व मित्र परिवाराच्या एकच विनंती हट्टामुळे आमदार सुनील केदार यांनी हतबल होऊन मांचावर येऊण उपस्थित अलोट गर्दीशी संवाद साधावा लागला याप्रसंगी आपल्या उदबोधनातून म्हटले की बोलायला खुप काही आहे परंतू ही वेळ आणी मंच त्याकरिता योग्य नाही लवकरच आपणाशी संवाद साधना व आपले आपले आशीर्वाद प्राप्त करण्याकरिता आपल्या दारी हा सुनील केदार येणार.याप्रसंगी मी आपणास फक्त ईतकेच निवेदन करू ईच्छितो की आज समाजात जातीगत,व्यक्तिगत, समनताः असमानतेची जी तीढ़ निर्माण केल्या जात आहे.आपल्या गंगा जमना संस्कतीला तसेच राष्ट्रांच्या थोर संतांचा प्रतीमांना मलिन करण्याचे पाप सुरु आहे.आपल्या इतिहासाला मुठमाती देण्याचे कटकारस्थान करुण “नाथूराम घोडसे” सारख्या प्रवु्तींना उदय होऊ पाहत आहे.हे समाजाकरिता घातक आहे.व अश्या संधीसाधूं पासून आपन सावध रहावे व जे या संस्कृतीला पुढे आणत आहे त्यांना त्यांची जागा दाखविण्याची ही खरी वेळ आता आपणापुढे आली आहे.व मला विश्वास आहे ज्या प्रकारे प्रभु रामचंद्रा ने दशानन रावणाचे गर्व हरण करत त्याचा वध करुण असत्यावर सत्याचा विजय मिळवीला होता त्याच प्रकारे येणार्या विधानसभानिवडणूकीत परत एकदा जनता जनार्दनाचा आशीर्वाद या सुनील केदारांच्या पाठीशी रहावा असे आव्हान केले*
*सदर आयोजनाच्या यशस्वीते करिता राजेश खंगारे,विनोद जैन,किशोर गुह्रारीकर,गोपाल घटे,घनश्याम तुर्के यांनी अथक परिश्रम घेतले तर याप्रसंगी. माजी नगराध्यक्ष पवन जैस्वाल,माजी नगर उपाध्यक्ष विजय बसवार,नगर सेवक व नगर पालिका गट नेते सुनील चाफेकर,नगर सेवक निलेश पटे,दिपक बसवार,अँड्.युवराज बागडे,वरिष्ठ अधिवक्ता श्रिकांत पांडे,डॉ. भगत,मार्क.साखरपेकर,व्यापारा संघाचे सचिव व प्रयास टीमचे अध्यक्ष मनोज बसवार,प्रमुख्याने उपस्थित होते तर अश्विन कारोकार,सोनू राव साहेब,आयुष त्रिवेदी,मनिष रुषीया,शैलैश हजारी,सचिन लिडर,मनोज बघारे,सचिन मोहतकर,मोहीत बारस्कर,इमरान शाह आदिंनी परिश्रम घेतले.*
*कार्यक्रमाचे संचालन राजेश खंगारे यांनी तर प्रास्ताविक व आभार रामभाऊ उमाठे यांनी मानले.रावण दहणाच्या आयोजनास उसळलेल्या अलोट गर्दीचे नियोजन तसेच कोणत्याही अप्रिय घटनेचची पुर्वतयारी म्हणून सावनेर पो.स्टे.चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तसेच अग्नीबंब व प्रथमिक आरोग्य केन्द्र सावनेर ची रुग्णवाहिका सह चोख बंदोबस्त करण्यात आला होता*