*जगप्रसिद्ध थोर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ शहा यांची जयंती कार्यक्रम साजरा*
*विशेष प्रतिनिधी- प्रा.प्रेमाचंद हटवार*
शंभुक संताची डॉ. मेघनाथ शहा प्रबोधन मंच आणि विदर्भ तेली समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक भारताचे जगप्रसिद्ध थोर शास्त्रज्ञ १९३४ च्या इंडियन काँग्रेसच्या २१व्या अधिवेशनाचे अध्यक्ष, युवकांचे प्रेरणास्थान, संसदेत खासदार, दिवंगत डॉ. मेघनाथ शहा यांची जयंती कार्यक्रम ६ ऑक्टोंबर ला साजरी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रेमानंद हटवार यांनी केले तर प्रास्ताविक श्री.संजयजी भलमे यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.संजय नरखेडकर यांनी डॉ. मेघनाथ शहा यांच्या “जीवन कार्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या “विषयावर प्रभाव टाकला. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.संजयभाऊ शेंडे यांनी “राजकीय जीवनशैली आणि समाजातील वाईट,रुंढी परंपरा विरोधी डॉ. मेघनाथ शहा यांच्या विचार “या विषयी माहिती दिली. तर श्री.संजय सोनटक्के विदर्भ तेली समाज महासंघाचे सचिव यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.धनराज तळवेकर, अनिल घुशे,राजेंद्र डकरे, संजय रेवतकर, पुरुषोत्तम कांबळी,रमेश उमाटे,अनुज हुलके (अभियान चे संपादक) यांच्यासह तेली समाजाच्या इतर सदस्यांचे सहकार्य लाभले.