*कोरपना येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या शेकडो कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश*
*कोरपना*- तालुक्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , आमदार संजय धोटे , जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथे पक्ष प्रवेश झाला.
आमदार संजय धोटे यांनी विधानसभा क्षेत्रात पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या झंझावाताला प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्याचे समजते.
यामध्ये कोरपना तालुका राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष व नगरसेवक अमोल आसेकर , माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भारत चन्ने , अबरार अली, संदीप टोगे , सुभाष डाखरे , शंकर चींतलवार , विठल तूमराम , शरद आकुलवार , संभा झाडे, रामचंद्र भोस्कर ,अनिल ढवस, पुंडलिक टोंगे, संजय धगडी, नामदेव लेडांगे , दिनेश डोहे , पुंडलिक कारेकर, शंकर कोरवते ,सुभाष आत्राम , सत्यवान घोटेकर, नामदेव विधाते, दिलीप तूरणकर , संगीता चिंतलवार , शांता कुळमेथे, सुमन परचाके , अमोल ढवस,विलास गिरसावळे, सादिक भाई, नजीर भाई, रामदास कूमरे , गिरिधर कोराम , अरुण बिडवाईक ,बंडू मोहितकर , रमेश डाखरे, बाळू झाडे , तायर अली, जब्बार भाई , खुशबू दीन , जब्बार शेख , मोणू बेग, लतिफ शेख , नाजिम शेख , संदीप हंसकर, दिलीप घटे , शफी शेख , मोबिन बेग, श्रीकांत गौरकर , जाफर खान, नदीम शेख, निखिल कारेकर , समीर शेख , अयुब खान, अलीम बेग , फहीम शेख , निलेश कुमरे, बाळू झाडे , देवराव खनके , राजू पत्रीवार, अरुण बीड वाईक सह शेकडो कार्यकर्त्यानी प्रेवेश केला. यामुळे कोरपना तालुक्यात भारतीय जनता पार्टीला मोठे कार्यकर्त्यांचे बळ मिळाले असून या विधान सभेच्या निवडणुकीत याचा भाजप उमेदवारास मोठा फायदा होणार आहे. याशिवाय कोरपना शहरात भाजपला याचा मोठा फायदा मता धीक्यासाठी होणार असल्याचे मानले जात आहे.