दारूविक्री सोडली हो साहेब,कसा विश्वास देऊ.
(काही पोलिस सतत मागे/वाल्याला वाल्मिकी बनवू देईना)
आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यापासून झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकांनी मोठ्याप्रमाणात विविध प्रकारच्या शक्कल लढवून अवैध दारूविक्रीचा मार्ग निवडला.यासर्व घडामोडीत कर्तव्यदक्ष अपवाद वगळता काही भ्रष्ट पोलिसांनी यांना खुली छूट देत चांदी करून घेतली.अनेक दारु विक्रेत्यांवर गुन्हे सुद्धा दाखल होऊन पोलिसी खाक्याचेही अनुभव मिळाले.पण आता काही दारु विक्रेत्यांनी हा अवैध धंदा कायमचे सोडून स्वाभिमानाने जगण्याची शपथ घेतली मात्र मागणी पूर्ण होत नसल्याने काही भ्रष्ट पोलिस कर्मचारी सुडबूद्धीने सतत यांना माल नाही भेटला तरी दाबण्याच्या प्रयत्नात असून “साहेब आम्ही दारुविक्री सोडली हो,कसा विश्वास देऊ” अशी व्यथा गडचांदूर येथील दारुविक्री सोडलेल्या एका तरुणाने नाव न छापण्याच्या अटीवर बातमीदारा कडे मांडून वरिष्ठांकडून न्यायाची मागणी केली आहे.
शासन अट्टल गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देते,नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित करते,आरोपी सुधारावा या उद्देशाने तुरुंगात टाकतात मग यांना सुधारण्याची एक संधी का नाही.वाल्या डाकू वाल्मिकी बनला हा इतिहास आहे.मग यांना या दलदलीतून बाहेर पडण्याची एक संधी दिली तर यात गैर काय,असे मत अनेक विचारवंताकडून व्यक्त होताना दिसत असून काही पोलिसांकडून अटक होण्याच्या भितीने स्वतःचा घर परीवार सोडून दारोदारी भटकंती करणाऱ्या दारुविक्री सोडलेल्या तरुणांना सुधारण्याची एक संधी पोलिस अधीक्षकांनी द्यावी अशी मागणीसह विनंती करण्यात येते आहे.