कोजागिरी निमित्य समाजातील गुणवन्त विद्यार्थी व विविध क्षेत्रांत कामगिरी बजावणाऱ्याचा सत्कार सोहळा*

कोजागिरी निमित्य समाजातील गुणवन्त विद्यार्थी व विविध क्षेत्रांत कामगिरी बजावणाऱ्याचा सत्कार सोहळा*

सर्व क्षेत्रात समाजातील तरुणांचा पुढाकार गरजेचा

वैभव ठाकरे.*

आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे

*कोरपना तालुका तिरळे कुणबी समाजाचे आयोजन

कोरपना तालुका तिरळे कुणबी समाज बांधवांच्या वतीने आयोजित कोजागिरी निमित्य गुणवन्त विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या बांधवांचा सत्कार सोहळा शनिवारला नांदा फाटा येथे संपन्न झाला.

जो समाज गुणवंताचा कला गुणांना व्हाव मिळावा भविष्यात उंच शिखर गाठावे या करिता सन्मान सत्कार करतो तो अशा कार्यक्रमाद्वारे पाठिवर आशीर्वादाची थाप देतो तोच समाज प्रगती करतो.
समाजातील विद्यार्थी व तरुणांनी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय अशा विविध क्षेत्रात पुढे येणे आता गरजेचे असून आता छोटा विचार न करता मोठा विचार करणे गरजेचे असल्याचे बोलतांना वैभव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय ठाकरे मुख्य वनरक्षक चंद्रपूर,उदघाटक से.नी.प्राचार्य श्री सुभाष पाथरीकर,तसेच स्मिता ठाकरे प्राचार्य प्रियदर्शनी महाविद्यालय घुगूस,श्री वैभव ठाकरे स्पर्धा परीक्षा अभ्यासक वणी,सौ.वैशालिताई भोयर पो.पाटील नांदा, ठाकरे साहेब से.नी.पोलीस अधिकारी गडचांदूर,प्राचार्य प्रफुल माहुरे सर,श्री रामदासजी इंगोले,शामसुंदरजी राऊत यांची प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊ, जगतगुरु तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार,व दीपमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील समाजातील गुणवन्त विद्यार्थ्याचा तसेच विविध क्षेत्रात सेवा देऊन निवृत्त झालेल्या,सेवेत कार्यरत असलेल्या समाज बांधवांचा सन्मान चिन्ह व प्रमानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
मंचावरील मान्यवरांनी थोर महापुरुषांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख युवा मित्रमंडळाचे विशेष सहकार्य लाभले मोठ्या प्रमाणात तालुक्यातील तिरळे कुणबी समाज बांधवांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रज्ञा राऊत यांनी तर प्रास्ताविक मनीष लोंढे,यांनी तर आभार प्रफुल बोडखे यांनी मानले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …