*विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू*

*विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू*

*तिष्टी(बु) येथील घटना*

सावनेर प्रतिनिधि-सुरज सेलकर

*सावनेरःतालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत तिष्टी (बु) येथे आंघोळ करीत असताना आंघोळ झाल्यानंतर घरात सुरू असलेल्या टिल्लू मोटर पंप सुरू असलेल्या विद्युत प्रवाह करणाऱ्या वायर सोबत संपर्क झाल्यामुळे विद्युत प्रवाह संचारीत होऊन झालेल्या अपघातात तीष्टी(बु) येथील युवकाचा दुर्दैवी अतं झाल्याची घटना दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली असून कल्पेश लीलाधर मोहतकर 24 असे मृतकाचे नाव आहे.*


*मु्तक कल्पेश लिलाधर मोहोतकर हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण असून शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्याचे वडील व तो शेती करायचा व आपली उपजीविका चार एकर शेतीवर भागवायचा जेव्हा शेतीत काम नसल्याने त्याचे आई-वडील व तो दुसऱ्याच्या मोलमजुरी ने इतर शेतकऱ्यांच्या शेतात काम करायला जात होता स्वतःच्या घरी असलेल्या शेतीत त्याने वांगी,भाजीपाला व कापूस हे पीक लावले होते कपाशीची मशागत झाल्यानंतर तो दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी आंघोळ करायला गेला परंतु टिल्लू मोटार सुरू असलेल्या विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेला स्पर्श होऊन तो जागीच मरण पावला ही घटना कळताच गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस स्टेशन केळवद ला दिली घटनेची माहिती मिळताच केळवद लगेच दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथे हलवला या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश मट्टामे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.सी.राठोड व पोलिस हवालदार देवकाते करीत आहे.*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …