*भाड्यानी आनलेली गर्दी या विधानावर भाजप उम्मेदवार पोतदार यांनी सार्वजनिक माफी मागावी*
(पवन जैस्वाल शहर काँग्रेस अध्यक्ष)
*नामांकनाची गर्दी,वाढते जनसमर्थन व लोकप्रियते तसेच दु्ष्य पराभवामुळे विरोधकांची सटकली*
*विरोधकांच्या वायफळ तोंड सुखाला उधाण*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*
*सावनेर शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ रजीव पोतदार यांनी दोन दिवसा आधी पत्रकार परिषद घेऊण दि.4 आक्टोंबर रोजी क्षेत्राचे आमदार व सावनेर कळमेश्वर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उम्मेदवार सुनील केदार यांचे नामांकन अर्ज दाखल करते वेळी उसळलेल्या अफाट जनसैलाबास “भाड्यानी आनलेली गर्दी” म्हणून काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी पत्र परिषदेत सार्वजनिक रित्या केलेल्या वक्तव्यावर सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे*
*सोबतच म्हटले की आमदार सुनील बाबूंच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उसळलेली त्यांच्या चहेत्या व काँग्रेस पक्षाच्या गर्दीमुळे त्यांचा मानसिक तोल सुटला आहे.उसळलेली गर्दी ही सुनील बाबू केदार यांच्या लोकप्रियतेची हमी व त्यांच्याप्रती असलेली प्रेमाची यातुन दिसते.त्यामुळेच वीरोघकांना आजच आपला पराभव दिसत असल्याने ते भांभावून जाऊन असले खोटे आरोप करत प्रामाणिक पक्षनिष्ठ कार्यकर्ते व केदार सयर्थकांच्या भावना दुखावण्याचे कट-कारस्थान करत आहेत.*
*भारतीय जनता पक्षाचे सावनेर नगर पालिका सहित गल्ली ते दिल्ली पर्यंत मागील पाच वर्षापासून एकहाती सत्ता आहे परंतू त्यांच्या प्रचारात मागील पाच वर्षाच्या विकास कामामानंवर भाष्य केल्या जात नाही,पाकिस्तान,धारा 370 अश्या वायफळ विषयावर ज्यांचे राज्याच्या निवडणुकीशी तीळमात्र ही संबध नाही अश्या विषयावर गरळ ओकली जात आहे.याउलट काँग्रेसचे उमेदवार सुनील बाबू आपल्या विकास कामावर मते मागत आहेत.तर आपल्या भाषणातून वीरोधी पक्षाचे उम्मेदवार व त्याचे वक्ते म्हणतात की सुनील केदार म्हणतात की माझ्या पक्षाची सत्ता नसल्याने विकास कामे होत नाही ही खोटी बाब आवार्जुन लोकांना सांगतात हे ही त्यांचे म्हणने सपशेल खोटे आहे.व या विषयावर आमदार सुनील बाबू केदार यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांची पुस्तीका तयार केली असुन ती लवकरच क्षेत्रातील मतदार बंधू-भगिनींच्या समक्ष प्रस्तुत होणार असल्याचे ही स्पष्ट केले.*
*काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय उम्मेदवार सुनील बाबू केदार यांना मिळत असलेले भारी जनसमर्थना बरोबरच विदर्भणा संघटना,निमा संघटना,व्यापारी संघ सावनेर,तेली समाज पंच कमेटी,आय.एम.आय.तर्फे ही जाहीर पाठिंबा दीलेला आहे.तर शहरातील अनेक देवस्थान कमीट्या,काही क्रीडा संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते स्वय:फुर्तीने प्रचार कार्यात पुढे येत असल्याने विरोधी पक्षात पराभवाची धडकी भरली असल्यामुळे ते असे खोटे नाटे बोलुन काँग्रेस पक्षाचे कर्यकर्ते तसेच सुनील केदार प्रेमींच्या भावना दुखावण्याचे कटकारस्थान करत आहेत.*
*प्रसार माध्यम हे समाजाचे चौथे व मुख्य आधार स्तंभ आहे व आपल्या माध्यमातुन ही सत्यता मतदात्यांपुढे यावी तसेच विरोधी पक्षाचे उम्मेदवार डाँ राजीव पोतदार यांनी केलेल्या वक्तव्यावर सार्वजनिक रीत्या जाहीर माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्षनिष्ठ व केदार प्रेमी त्यांना जाहीर रीत्या माफी मागण्यास भाग पाडेल असे निवेदन पत्र परिषदेत केले.याप्रसंगी डोमासाव सावजी,मनोज बसवार,गोपाल घटे,अश्विन करोकार आदी प्रमुख्याने उपस्थित होते*