*तायवाडे महाविद्यालयात “डीजिटल मार्केटिंग “वर वेबिनार चे आयोजन*

*तायवाडे महाविद्यालयात “डीजिटल मार्केटिंग ” वर वेबिनार चे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले


नागपुर:- तायवाडे महाविद्यालय , महादुला – कोराडी येथे कॉउन्सलिंग आणि प्लेसमेंट समिती तर्फे *”डिजिटल मार्केटिंग”* या विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले . या वेबिनार साठी प्रमुख वक्त्या व मार्गदर्शक म्हनूण समैरा कौर मॅनेजींग डॉयरेक्टर , अॅफीटेक , बैंगलोर या होत्या.तर वेबीनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे या होत्या . समैरा कौर हयांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून डीजीटल मार्केटिंग व त्याचे फायदे , आणि डीजीटल मार्केटिंगमध्ये व्यवसायाच्या संधी , डीजीटल कौशल्य , व ते हस्तगत करण्याचे मार्ग विशद केले . या प्रसंगी वेबिनार च्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे यांनी वेबिनार मागची भूमिका स्पष्ट करतांना कोरोणा महामारीच्या काळामध्ये डीजिटल मार्केटिंग हे व्यवसाय टिकुण राहणे व त्याचे पुर्नस्थापन करणे यासाठी वरदानच आहे असे मत मांडले . या वेबिनार चे प्रास्ताविक व संचालन समिति चे समन्वयक डॉ . अजय रामटेके यांनी केले , तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ . अभिविलास नखाते यानी करुन दिला .आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ . दिलीप चाफले यांनी केले . या वेबिनारला महविद्यालयातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . वेबिराच्या यशस्वितेसाठी समितीचे सदस्य प्रा.डी.एन.निकम , प्रा . डॉ . योगेश थेरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …