येळकोट येळकोट जय मल्‍हार च्‍या जयघोषात मुल येथे मेढपाळ परिषद संपन्‍न

सदैव लोकहीत जोपासणा-या सुधीर मुनगंटीवार यांना बहुमताने विजयी करा – महादेव जानकर यांचे आवाहन


*धनगर समाज बांधवांच्‍या सोबत सदैव खंबीरपणे उभा राहील – सुधीर मुनगंटीवार*

*येळकोट येळकोट जय मल्‍हार च्‍या जयघोषात मुल येथे मेढपाळ परिषद संपन्‍न*

आवारपूर प्रतिनिधि :- गौतम धोटे

मुल- मेढपाळ परिषद जय मल्हार च्याजयघोषात आज संपन्न
गेल्या दिनांक 18 जून 2019 रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पात धनगर समाजासाठी विविध कल्‍याणकारी योजना लागू करण्‍याच्‍या दृष्‍टीने एक हजार कोटी रूपयांची तरतूद जाहीर केली. नेहमीच धनगर समाजाच्‍या हिताची भुमीका सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सदैव लोकहित जोपासणारा हा नेता पुन्‍हा विधानसभेत बहुमतासह निवडून पाठवावा असे आवाहन राज्‍याचे पशु संवर्धन व दुग्‍धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. धनगर समाज बांधवांचे हित जोपासत त्‍यांच्‍या मागण्‍यांची पूर्तता करत सदैव त्‍यांच्‍या सोबत खंबीरपणे उभा राहील, अशी ग्‍वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार सभागृह मुल येथे मेंढपाळ  परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी पशु संवर्धन व दुग्‍धविकास मंत्री महादेव जानकर, बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा-शिवसेना-रिपाई (आ)-रासप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, डॉ. विकास महात्‍मे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. कन्‍नमवार, संजय कन्‍नावार आदींची प्रमुख्‍याने उपस्थिती होती.  
 
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी येळकोट येळकोट जय मल्‍हार अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, धनगर समाजाची सेवा करण्‍याचा संकल्‍प आमच्‍या सरकारने सतत जोपासला. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. निःस्‍वार्थ समाजसेवेचे मुर्तीमंत उदाहरण म्‍हणजे पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर. अहिल्‍यादेवींच्‍या स्‍मरणार्थ राज्‍यातील अनेक गावांमध्‍ये सभागृहांचे बांधकाम करण्‍यासाठी आम्‍ही मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध केला. त्‍यांचे विचार गावोगावी पोहचविण्‍यासाठी या सभागृहाचा निश्‍चीतपणे उपयोग होणार आहे. अ‍र्थसंकल्‍पात धनगर समाजासाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूद आम्‍ही केली. ज्‍या 13 योजना घोषीत करण्‍यात आले आहे त्‍यांची प्रभावी अंमलबजावणी व्‍हावी तसेच धनगर समाजातील तरूणांच्‍या हाताला रोजगार मिळावा यासाठी आपण विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्‍याचे सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
 
यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, संजय कन्‍नावार, डॉ. कन्‍नमवार आदींचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाला धनगर समाज बांधवांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …