*कर्जापायी शेतकऱ्यांची गळफास लावून आत्महत्या*
*धापेवाडा खुर्द येथील घटना*
कळमेश्वर तालुका प्रतिनिधी
*कळमेश्वर तालुक्यातील धापेवडा खुर्द येथे एका शेतकऱ्याने शेती करण्यासाठी घेतलेल्या कर्जापायी स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली महादेव रघुनाथ रानडे वय 48 वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक महादेव रानडे यांचेकडे चार एकर शेती असून गेल्यावर्षी कापसावर आलेल्या बोंड अळी मुळे मोठ्या प्रमाणात कपाशीचे नुकसान झाले कपाशी लागवडीसाठी मृतक महादेव यांनी लोकांकडून हातउसने पैसे घेतल्याचे माहिती असून याबाबत त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत लिहून ठेवले मृतक महादेव यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार असून घटनेच्या वेळी पत्नी शेतामध्ये होती तर मुलगा बाहेर होता मुलीचे लग्न झाले असून मृतक महादेव हे घराचे कमावती व्यक्ती होते मृतक महादेव यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याच्या घटनेने धापेवाडा आणि परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे कळमेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे*