*साक्षोधन कडबे यांना महा आवास अभियान पुरस्कार*
रामटेक प्रतिनिधी: पंकज चौधरी
रामटेक – महाराष्ट्र शासन द्वारा महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत पंतप्रधान आवास योजना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण आवास योजनेसह विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कोविड-१९मध्ये विशेष कामगिरी करणार्या व्यक्तीं, अधिकारी तसेच ग्राम पंचायतींना पंचायत समिती रामटेक द्वारा ३ सप्टेंबरला *महा आवास अभियान पुरस्कार २०२०-२१* प्रदान करण्यात आले.
यावेळी महा आवास अभियान व कोरोनाच्या संकट काळात लोककल्याणार्थ केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल *रामटेकचे तहसिलदार बाळासाहेब मस्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.चेतन नाईकवार यांचेसह आकाशझेप फाऊंडेशनचे संस्थापक सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांना रक्तदान शिबीर आयोजन करून शासकीय रुग्णालयातील जनसामान्य रुग्णांच्या निःशुल्क रक्त सेवेसाठी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल आमदार ॲड. आशिष जयस्वाल, सभापती रविंद्र कुंभरे, गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांचे शुभ हस्ते महा आवास अभियान पुरस्कार २०२०-२१ प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला जि.प.सदस्य सतिश डोंगरे, पं.स.सदस्य नरेंद्र बंधाटे, संजय नेवारे, चंद्रकांत कोडवते, रिता कठौते, पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी, ग्राम सचिव, कर्मचारी व लाभार्थी तसेच आकाशझेपच्या सुषमा गजभिये उपस्थित होते.