*पिपळा डाक बंगल्यावर गुन्हेगाराची नजर ; अडीच महिन्यात दोन खून* *एक पिस्तुल दरोडा घटना ; चोर्‍याचे प्रमाण वाढले* *पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?*

*पिपळा डाक बंगल्यावर गुन्हेगाराची नजर ; अडीच महिन्यात दोन खून*

*एक पिस्तुल दरोडा घटना ; चोर्‍याचे प्रमाण वाढले*

*पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?*

पिपळा डाक बंगला – सावनेर तालुक्यातील पिपळा (डाकबंगला)ता.सावनेर हे गाव खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून मागील अडीच महिन्यांपासून गुन्हेगारीच्या विविध होणाऱ्या घटनेसाठी परिसरात चर्चेत आहे येथे मागील काही दिवसात खून,दुकान लुटणारे बंदूकधारी,चोरी,मारहाण,बाईकचोरीच्या घटना तसेच इतर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यावर अंकुश लागणार कधी?असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी कोणतीही योजना केल्या जात नसून पोलिस यंत्रणेवर व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे
दहा जून रोजी पिपळा रेल्वे लागत येथे चार तरुणांनी मध्यरात्री टीकासने वार करीत संतोष सोलंकीचा खून केला तसेच सतरा ऑगस्टला रात्री साडेसात दरम्यान तुलसी ज्वेलर्स या सराफा दुकान मध्ये तीन अज्ञात बंदूकधारीनी दुकानात घुसून व शटर बंद करून बंदुकीच्या धाकावर महामार्गावरील दुकान लुटण्याचा प्रयत्न केला मिलन सोनी व सीमा सोनी यांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली व दरोडेखोरांचा प्रयत्न असफल झाला त्याचप्रमाणे 29 ऑगस्टला शिवली बोधी भिक्कु निवास येथे रामदास मेश्राम यांनी महिला शिष्य कुसुम चव्हाण यांचा चाकूने गळा कापून व डोक्यावर हातोड्याने वार करीत खून केला पिपळा परिसरामध्ये सध्या हनुमान मंदिर व पिसामाय मंदिर जुनी वस्ती येथे दानपेट्या चोरी तसेच बाईकचोरी घटना झाल्या,बाबा आमटे युवा पार्क येथे लाईट चोरीला गेले महामार्गावर असलेले टाटा इंडिकेस एटीएम सुद्धा अठरा ऑगस्टला मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न केला आहे
सोमवार (३०)ला मध्यरात्री तिनच्या सुमारास मोहन तागडे यांचे वस्ती लागत असलेले महिंद्रा ट्रॅक्टर टाली सहित चोरटयांनीं जवळपास शंभर फूट दूर पळून नेत असतांना अचानक काशीनाथ तागडे यांची गाडी आल्याने ट्रॅक्टर सोडून चोरटे पळून गेले नागरिकांच्या घराचे बांधकाम साहीत्य व सेंटरिंग सुद्धा चोरटे पळून नेत आहे
तसेच सुखदेव मलवे यांच्या जुनी वस्ती येथील साठ हजार किमतीच्या दोन गाई सुद्धा चोरट्याने गोठ्यातून पळविल्या लॉकडाउन व वाढती बेरोजगारी मुख्य कारण असून चोरटे चोरी करतांना नवीन शक्कल लढवीत असून चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे पिपळा येथील नागरिक दहशत मध्ये असून खापरखेडा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे

*पिपळा डाक बंगला परिसरात मागील अडीच महिन्यात खून,लूटमार,चोरी घटना प्रमाणात जास्त वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी*

*प्रल्हाद ठाकरे (पोलीस पाटील)*
*पिपळा डाक बंगला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …