*सावनेर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला लाच स्वीकारतांना अटक*

*शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला लाच स्वीकारतांना अटक*


*एक हजार रुपये लाच स्विकारतांना रंगेहात अटक*

*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले*

सावनेर : येथिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कंत्राटी नियमानुसार लागल.ेल्या शिक्षकाच्या वेतनातुन एक हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागांकडून सावनेर येथिल शासकीय अौद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष शिवन्ना पेडापल्लीवार (५६) रा. नागपुर यांना सावनेर येथे अटक करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात कंत्रात नियमावर लागलेला शिक्षकाचा सात हजार रुपये वेतन निघाले असता ,प्राचार्य पेडापल्लीवार यांनी एक हजार रुपयांची संबधित शिक्षकास मागणी केली. पैसे देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रात लाचलुचपत विभागास केली . लाचलुचपत विभागाने सापळा रचुन प्राचार्यास व सह आरोपी रविकिरन रूषीया (२८) सावनेर यांच्या माध्यमातुन एक हजार रुपये स्विकारतांना पकडले. प्राचार्य प्रत्येक कंत्राटी शिक्षकांकडुन मिळालेल्या वेतनमधिल पैसे मागायचे हा प्रकार अनेक महिन्यापासुन सुरु होता असे बोलले जात आहे.

प्राचार्याना रिटायरमेंट ला फक्त दोन वर्ष उर्वरित असल्याचे माहिती आहे.


सदर कारवाही
पो.अ.एसीबी रश्मी नांदेकर,अप्पर पो.नि.राजेश घुगलवार,उप.अधिक्षक विजय माऊलकर,मिलिंद तोतरे यांचे मार्गदर्शनात पो.नि. दिनेश लाबडे,पोहवा.सुनिल कळंबे,दिनेश शिवल, शालिनी अंबुलकर,युशील यादव,नरेंद्र चौधरी,राजेश बंसोड यांनी केली.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …