*रिलायंस स्टोर्स यांना ना हरकत प्रमाणपत्र न देण्याची मागणी*
*कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे जिल्हाधि कारी व नगरपरिषद प्रशासना ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत रिलायंस स्टोर्स माॅल सुरु करण्यात येत असुन या आधीच कोरोनाच्या महा मारीमुळे शासना द्वारे लावण्यात आलेल्या लाॅकडाऊन मुळे शहरातील छोटे मोठे व्यापारांचे चांगलेच नुकसान झाले असुन त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्या करिता खुप त्रास सहन करावा लागत असल्याने कन्हान- कांद्री दुकानदार महासंघाने मा. जिल्हाधिकारी व कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन यांना एक निवेदन देऊन रिलायंस स्टोर्स यांना ना हरकत प्रमाणपत्र न देण्याची मागणी केली आहे.
मागील दोन वर्षापासुन राज्यात, जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने नियमावली कडक केली असुन लाॅकडाऊन लावण्यात आल्याने शहरातील छोटे मोठे व्यापारांचे चांगलेच नुकसान झाले असुन त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्या करिता खुप त्रास सहन करावा लागत आहे. अश्यातच शहरात रिलायंस स्टोर्स उघडले तर छोटे मोठे व्यापारी दुकानदारांना भयंकर आर्थिक नुकसान होईल याची दाट शक्यता वाढल्याने कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाने मा.जिल्हाधिकारी व कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन यांना एक निवेदन देऊन या विषयाला गंभीर्याने घेवुन रिलायंस स्टोर्स यांना ना हरकत प्रमाणपत्र न देण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान – कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरैशी, सचिव प्रशांत मसार, सचिन गजभिये, प्रदीप गायकवाड, मिलींद मेश्राम, दिपक तिवाडे सह आदी दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.