*कोराडी दहेगाव महामार्गावरील उड्डाणपुलावर मोटारसायकल डीवाईडरला टकरावून अपघात*

*रस्ते अपधातात युवकाचा मु्त्यू*


*कोराडी दहेगाव महामार्गावरील उड्डाणपुलावर मोटारसायकल डीवाईडरला टकरावून अपघात*

*खापरखेडा: प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील कोराडी दहेगाव उड्डाणपुलावर आज (२२/१०/२०१९) सायंकाळी सातच्या सुमारास एका तरुणाची मोटरसायकल डीवायडरला टकरावून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार उदय कैलास बाटे-२४ रा.वार्ड न.२ नविन बिना भानेगाव(खापरखेडा) त.सावनेर जि.नागपुर असे मृतकाचे नाव असून मृतक हा सायंकाळी ६ च्या सुमारास कोराडीला काही कामानिमित्त गेला असताना खापरखेड्याला वापस घरी जात असताना मोटर सायकल (स्पोर्ट बाईक) नं .MH-12-JV-6336 वेगाने चालवत असताना वाहनांचे नियंत्रण सुटल्यामुळे मृतक डीवाईडर टकरावून जवळपास शंभर मीटर अंतरावर घसाटत गेला.दरम्यान घटनास्थळावर मृतकाच्या डोक्याला जबर मार लागून रक्ताचा सळा घटनास्थळावर पडलेला होता. ज्यामुळे त्याच्या भीषण अपघात घडून प्राणज्योत मावळली.वर्दळीचा मुख्य मार्ग असल्याने मुख्य मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्यांना दिसताच बघ्यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली.व नागरिकांनी खापरखेडा पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. खापरखेडा पोलिसांनी लागलीच घटनास्थळ दाखल करून मृतकाचे प्रेत शवविच्छेदनात करिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.मृतक हा अविवाहित असून मृतक हा आज सकाळी १२ वाजता पासून घरुन गेला असल्याची माहिती मिळाली आहे.मृतकाचे रेडीमेड कापडाचे दुकान व ऑटो डीलचे काम करीत होता.सदर घटनेची खापरखेडा पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …