*खासदार अशोक नेते यांची केंद्रीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कल्याण संबंधी संसदीय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती*
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री अशोकजी नेते यांची अनुसूचित जाती तथा अनुसूचित जमातीच्या कल्याण संबंधी स्थायी समिती भारत सरकार च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समिती द्वारा भारत सरकार SC व ST समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या उत्थानासाठी विविध उपक्रम व योजना राबवून त्या योजनांची अंमलबजावणी झाली किंवा नाही तसेच त्याचा प्रत्यक्ष लाभ या समाजाला मिळाला किंवा नाही याची माहिती जाणून घेणे केंद्र सरकारला सोयीचे होणार आहे . तसेच प्रशासकीय यंत्रणा केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करते किंवा नाही याची माहिती ही समिती जाणून घेणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षण व इतर सवलती बाबत या समितीत विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे.
खासदार अशोक नेते यांची या समितीवर नियुक्ती झाल्याने गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील SC & ST समाजाच्या अडी- अडचणी, महत्वाचे प्रश्न केंद्र स्तरावर सोडविणे सोयीस्कर झाले आहे.
भारत सरकारच्या अनुसूचित जाती, जमाती कल्याण संबंधी संसदीय समितीच्या सदस्य पदावर खासदार अशोक नेते यांची निवड झाल्या बद्दल मनस्वी अभिनंदन!!!_दिनेश शेराम, अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग, सिनेट, व्यवस्थापन परिषद सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.