*सावनेर पोलिसांचा रुट मार्च*
सावनेर – पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत सावनेर शहरात गणेश उत्सव संदर्भात कायदा सुव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोनातून आज दिनांक 16 9 2021 रोजी 16.30 ते 17 30 वाजता पर्यंत मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनात रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्च मध्ये 07अधिकारी 21 अंमलदार व मुख्यालय नागपुर ग्रामीण येथील 01 RCP पथक 1 अधिकारी 24 अंमलदार व 14 होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते. रूट मार्च पोलीस स्टेशन सावनेर येथून गांधी चौक, गडकरी चौक, जयस्तंभ चौक, मडकी चौक, जामा मजीत, मुरलीधर मंदिर, होळी चौक, बाजार चौक ते परत पोलीस स्टेशन पर्यंत घेण्यात आला.