गडचांदूर शहर विकासाच्या प्रतिक्षेत.
एक धोटे गेले,दुसरे आले,परीवर्तन घडेल का ?
आवारपूर गौतम धोटे
महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.राजूरा क्षेत्रात काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी चुरशीच्या लढतीत बाजी मारली तर अँड.वामनराव चटप यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.यंदाच्या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात होते.यापैकी भाजपा अँड.संजय धोटे,स्वतंत्र भारत पक्ष अँड. वामनराव चटप, काँग्रेस सुभाष धोटे आणि वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गोदरू पाटील जुमनाके यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळाली.अत्यंत अटीतटी व रोमांचकारी लढतीत सुभाष धोटे हे २३०० मतांनी विजयी झाले. सुभाष धोटे ५९५७१,अँड. चटप ५७२०१,अँड.धोटे ५०५३१ आणि .शेवटी “एक धोटे गेले आणि दुसरे धोटे आले” विकासाचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर ठिकाणांसह विशेषतः गडचांदूर शहरात विविध समस्यांचा डोंगर उभा असून मुख्यतः बसस्थानकाचा प्रश्न ऐरणीवर आहे.त्याच बरोबर ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता,शहरात मोठा सिमेंट प्रकल्प असून सुद्धा तरुण बेरोजगारी,कुसुंबी प्रकरण,गडचांदूर तालुक्याची निर्मिती,मुख्य मार्गावर पडलेले खड्डे अशा अनेक लहानमोठ्या समस्या सोडविण्याचे आवाहन नवनिर्वाचित आमदारापुढे असून याच्या पूर्ततेसाठी ओरडून ओरडून नागरिकांच्या घशाला कोरड पडली मात्र गेल्या पाच वर्षात याबाबतीत निव्वळ आश्वासने मिळाली आता नवनिर्वाचित आमदार याला कितपत न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.