*”गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बाप्पा चे विर्सजन* *काली मंदिर कन्हान नदी पात्रात ढिवर समाज संघटनेच्या जिवन रक्षक पथका व्दारे श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विसर्जन*

*”गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बाप्पा चे विर्सजन*

*काली मंदिर कन्हान नदी पात्रात ढिवर समाज संघटनेच्या जिवन रक्षक पथका व्दारे श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विसर्जन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गणेश महोत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात येतो. परंतु राज्या सह नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे सावट असल्याने शहरातील परिसरात शासनाच्या नियमाचे पालन करून श्री गणेश महोत्सव थाटात साजरा करण्यात आला असुन अनंत चतुर्दशी च्या दिवशी कन्हान -पिपरी नगरपरिषद द्वारे काली मंदिर कन्हान नदी काठावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असुन कडक पोलीस बंदोबस्तात ढिवर समाज संघटनेच्या जिवन रक्षक पथकाने दोन दिवस कन्हान परिसर व कामठी येथील घरघुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विर्सजन करून श्री गणेशजी ला शांततेत व आंनदाने “गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात निरोप देण्यात आले.


कन्हान शहरात व परिसरात शुक्रवार दिनांक.१० सप्टेंबर ला श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी बाप्पाची घरो घरी ६१४ व सार्वजनिक शहर ४ आणि ग्रामिण १४ असे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असुन सकाळी व सायंकाळी होणाऱ्या आरती शिवाय कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता कोरोना काळातील शासनाच्या काटेकोरपणे नियमाचे पालन करून शहरात व परिसरात गणेश महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात व शहरात गेल्या काही दिवसापासुन सतत पाऊस होत असल्याने कन्हान नदी दुथडी भरुन वाहत असल्याने रविवार दिनांक.१९ व सोमवार दिनांक.२० सप्टेंबर असे दोन दिवस काली मंदिर सत्रापुर कन्हान नदी काठावर कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे गणेश विसर्जना करिता विद्युत (लाईटस), मंडप, लॉडीस स्पिकर व संपुर्ण व्यवस्था करण्यात आल्याने कडक पोलीस बंदोबस्तात ढिवर समाज संघटनचे जिवन रक्षक पथकाने कन्हान शहर परिसर व कामठी येथील नारिकांच्या हजारोच्या संख्येत घरघुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे काली मंदिर घाटाच्या कन्हान नदी पात्रात शिस्तबध्य विर्सजन करून श्री गणेशजी ला आंनदाने शांततेत निरोप देण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आय जी मा. छेरिंग डोरजे , पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी भेट देऊन विसर्जन परिस्थिती ची पाहणी केली. या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे, अनिल ठाकरे, वर्षा लोंढे , रेखा टोहणे , अजय चव्हान , अजय लोंढे , सह सर्व नगरसेवक , नगरसेविका उपस्थित होते. विर्सजना स्थळी कुठलीही अनुसुचित घटना घडु नये या करिता कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे, गुन्हे पोलीस निरीक्षक यशवंत कदम, एपीआई अमितकुमार आत्राम, वाहतुक पोलीस, दंगा नियंत्रक पथक व महिला, पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ढिवर समाज संघटन अध्यक्ष सुतेश मारबते, बालचंद बोंदरे, गितेश मोहने, मनोज मेश्राम, श्रीकांत मानकर महिला प्रतिनिधी रेखाताई भोयर, कुंदाताई कांबळे, जिवन सुरक्षा पथक प्रमुख शिवराम खंडाते, मोहन वाहिले, राजु मारबते, बंडुजी केवट, उमेश मेश्राम, धर्मराज खंटाते, विनोद गोंडाणे, रवि केवट, सचिन खंडाते, विजय गोंडाणे, संजय नारायण मेश्राम, सुधाकर सहारे, संजय नागोजी मेश्राम, प्रमोद गोंडाणे, मनोज दुधबावने, विक्की हावरे, रामचंद्र भोयर, हेमराज मेश्राम, धनराज बावने आदीने पावन कन्हान नदी पात्रात शिस्तबध्य श्री गणेश मुर्ती विसर्जन करण्याची कामगिरी बजावुन गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यात आला .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …