*वीज पडून खिंडसी जलाशयात मच्छीमारांचा मृत्यू*
*रामटेक तालुक्यातील पंचाळा येथील धक्कादायक घटना*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
संपूर्ण भारतात पर्यटन क्षेत्रात प्रख्यात असणारे खिंडसी जलाशयमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या सख्य्या दोन भावांपैकी त्यांच्या बोटीजवळ वीज पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक वृत्त समोर आले आहे.काल दि.20/09/2021 रोज सोमवारला पंचाळा येथील रहिवासी नामे, श्री.जटाशंकर गणपत नागपुरे (वय 40 वर्ष). व विष्णू गणपत नागपुरे (वय 30 वर्ष). हे दोघेही भाऊ सकाळी 8 वाजताच्या सुमारास रोजच्या प्रमाणे मासेमारी करायला आपल्या बोटीने खिंडसी जलाशयात गेले असता सकाळपासून चालत असलेल्या मुसडधार पावसाने अचानक आकाशातून वीज बोटीजवळ पडली.वीज इतक्या जवळ पडल्याने बोटीवर असलेल्या दोन भावापैकी मोठ्या भावाला विजेचा मोठा धक्का बसला.यात तो बेशुद्ध होऊन अचानक पाण्यात पडला.या सर्व घडलेल्या प्रकाराने त्यांची बोट उलटल्याची माहिती समोर आली आहे.अश्या वेळी मृत जटाशंकर गणपत नागपुरे यांचे लहान भाऊ विष्णू गणपत नागपुरे यांनी आपल्या भावाला शोधण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यात तो अयशस्वी झाला.नंतर तो स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत काठावर आला.व येऊन संपूर्ण घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील श्री.दिलीप भांडारकर यांना दिली.त्यांनी तात्काळ रामटेक पोलीस स्टेशन तसेच रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना फोनद्वारे माहिती दिली.नंतर रामटेक पोलीस स्टेशन येथील चमू तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.जवळपास सकाळी 10 वाजतापासून मृत व्यक्तीचे शव शोधण्यास सुरुवात करण्यात आली.दिवसभर शोधमोहीम करूनदेखील शेवटी शव हातात लागला नाही.नंतर शोधकार्य तिथेच थांबवून दुसऱ्या दिवशी परत शोधकार्य सुरू करण्यात आले.गावातील उपसरपंच श्री.योगेश रमेश माथरे यांनी दिलेल्या माहितीवरून असं लक्षात येते की,संबंधित मृत व्यक्तीचे शव शोधण्यासाठी NTDRC टीम बोलविण्यास तहसीलदार साहेबांना विनंती करण्यात आली.परंतु त्यांनी ते लोकं येऊ शकणार नाही म्हणून सांगितले.नंतर शोध घेऊन त्यांच्या लक्षात आले की कन्हान वरून काही गोताखोर व्यक्तींना बोलावून घेतले.व त्या सर्व गोताखोरांची टीम दुपारी 2 वाजताच्या सुमारास शव शोधण्यासाठी जलाशयात रवाना झालेत.2 दिवस सतत प्रयत्न करूनदेखील अजूनपर्यंत मृत शव प्राप्त झालेला नाही.शोधमोहीम अद्यापही सुरू असल्याचे समजते.मृत श्री.जटाशंकर गणपत नागपुरे यांची घरची परिस्तिथी अतिशय गंभीर असून त्यांच्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी हे जटाशंकरच्या खांद्यावर असल्याचे समजते.परिवारात पत्नी सौ.निशा जटाशंकर नागपुरे व दोन मुली असल्याचे समजते.