*प्रदिप बागडेच्या खुनाचा अवघ्या 12 तासांत उलघडा*
*स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ची कारवाई*
*पत्नीने पतीच्या मीत्रालाच सुपारी देऊन पतीला पोहचवीले यमसदनी*
सावनेर – दि. 21/09/21 रोजी सकाळी 10.00 वा. सुमारास तालुक्यातील पोलीस स्टेशन खापा अंतर्गत बडेगाव-खेकरानाला मार्गावरील महारकुंड शिवारातील एका पुलाच्या पायलीजवळ एका पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती दक्ष नागरीकांनी पोलीसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन खापा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळ गाठुन पाहणी केली. सदर मृतकाच्या छातीवर ठिकठिकाणी घाव दिसुन आल्याने त्याचा कोणीतरी अज्ञात इसमानी खून केला असल्याची खात्री झाली.*
*सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन खापा येथील ठाणेदार अजय मानकर व त्यांचे स्टाफनी घटनास्थळ पंचनाम्यासह इतर पुढील तपास सुरु केला. तसेच मृतक इसम हा अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविणे तसेच त्याच्या मारेक-यांचा शोध घेणे याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचा-यांचे वेगवेगळे पथक तयार करून मृतकाच्या मारेक-यांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना मृतक इसमाजवळ मिळुन आलेल्या ओळखपत्राच्या आधारे मृतक हा प्रदिप जनार्दन बागडे, वय वर्ष, रा. फ्लॅट नं.3 सरस्वती अपार्टमेंट, वंजारी नगर पाण्याच्या टाकीजवळ अजनी नागपूर असे असल्याचे समजले. त्यानुसार याबाबत अधिक माहिती घेतली असता माहिती मिळाली की मृतक इसम हा हरविल्यासंबंधी मृतकाच्या पत्नीने • पोलीस स्टेशन अजनी नागपूर शहर येथे दिनांक 16/09/2021 रोजी तक्रारीची नोंद केल्याची माहिती प्राप्त झाली.*
*वरील माहितीवरुन मृतकाच्या घरी जावुन मृतक घरून निघुन गेल्याबाबत त्याची पत्नी व इतर नातेवाईकाकडे विचारपूस करण्यात आली. दरम्यान माहिती समोर आली की मृतक इसम हा नरेंद्र नगर येथे मेट्रो बिर्याणी सेंटर नावाचे दुकान चालवित होता, नेहमीप्रमाणे दिनांक 15/09/2021 रोजी दुपारी 01.00 वा. मृतक इसम हा घरुन दुकानात गेला. व दिनांक 16/09/2021 रोजी रात्री 01.10 वा. सुमारास घरी परत आला. घरी परत आल्यानंतर त्याने घाईघाईत जेवन करुन अर्ध्यातासाने कुठे व कोणासोबत जात आहे हे घरी न सांगता घरून निघुन गेल्याचे सांगीतले. परंतु दिनांक 16/09/2021 रोजी घरी न आल्याने मृतकाची पत्नी नामे सौ. सिमा प्रदिप बागडे हिने पोलीस स्टेशन अजनी, नागपूर शहर येथे त्यांचे पती घरून निघुन गेल्याबाबत तक्रारीची नोंद केली असल्याचे सांगीतले. मृतकाच्या पत्नीकडे मृतकाच्या नातेवाईक व जवळच्या लोकांबाबत विचारपूस केली. सदर प्राथमिक चौकशीनंतर मृतकाच्या अपार्टमेंट मधील तळमजल्यावर लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीच्या आधारे पाहणी केली असता त्यामध्ये दिसून आले की दिनांक 16.09.2021 रोजी रात्री 01.40 वा. मृतकाच्या अपार्टमेंट समोरील रोड वर एक सुझुकी इको कंपनीची चारचाकी वाहन अगोदरच येवून थांबलेली दिसली. त्यानंतर मृतक इसम हा काही मिनिटातच मध्यरात्री 01.47 वा. सुमारास आपल्या राहत्या पलॅट मधुन निघुन खाली रोडवर आला व अगोदरच थांबलेल्या एक सुझुकी इको कंपनीची चारचाकी वाहनामध्ये बसुन निघुन गेल्याचे दिसले. याच घटनेचा आधार घेत पुढील तपासाची चक्रे फिरवुन तांत्रीक पुराव्याच्या आधारे शोध घेतला असता यातील मृतकाचे मारेकरी हे त्याचे जवळील लोक असल्याची शक्यता बळावली. मृतक इसम हा घरुन ज्या सुझुकी इको गाडीध्ये सहजरित्या बसुन गेल्याचे दिसल्याने अशा वर्णानाच्या वाहनाबाबत मृतकाच्या पत्नीकडे विचारपूस केली असता तिने याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगीतले. परंतु तिच्या बोलण्यावर शंका आल्याने मृतकाच्या राहत्या तसेच बिर्याणी सेंटर परिसरात जावुन गोपनीय माहिती काढली असता माहिती प्राप्त की मृतक इसमांकडे मागील 4 वर्षापासून कार वाशिंगचे काम करणारा इसम नामे पवन चौधरी याचे कडे अशाप्रकारचे वाहन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तांत्रीक पुराव्या आधारे तो राहत असलेल्या घरी गेलो असता त्यास नागपूर ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर असल्याचे समजल्याने त्याने काही मिनिटापुर्वी तो वापरत असलेला मोबाईल बंद करुन परिसरातून पळ काढला. त्यामुळे इसम नामे पवन चौधरी याचेवर अधिकच संशय बळावल्याने तो जाण्याच्या संभाव्य ठिकाणी हुडकेश्वर परिसरात शोध घेत असतांना पवन चौधरी याने त्याचा अल्पवयीन साथीदारासह पोलीस स्टेश हुडकेश्वर, नागपूर शहर येथे आत्मसमर्पन केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे जावुन इसम नामे पवन चौधरी यास त्याचे पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पवन पांडुरंग चौधरी, वय 21 वर्ष, रा. थडीपवनी, ता. नरखेड, जि. नागपूर, ह. मुशताब्दी चौकाजवळ, अजनी नागपूर असे सांगीतले. सदर इसमाकडे मृतकाच्या खूनाबाबत विचारपूस केली असता त्याने सविस्तर सांग की मृतक इसम नामे प्रदिप जनार्दन बागडे यांची पत्नी सी सिमा प्रदिप बागडे, वय 40 वर्ष, हिला मृतक हा वारंवार मारपीत करीत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळुन तिने तिच्या पतीला जिवानिशी मारण्याकरीता पवन चौधरी यास सांगुन त्या मोबदल्यात नगदी रोख व एक प्लॉट मिळवून देण्याचे आश्वासन दिले इसम नामे पवन चौधरी हा मृतकाच्या पत्नीच्या आश्वासनाला बळी पडुन त्याने त्याचा एक अल्पवयीन साथीदारासह मृतकाचा खून करण्याचा डाव आखला. ठरल्याप्रमाणे आरोपी पवन चौधरी याने दिनांक 15/09/2021 रोजी रात्री 09.00 वा. सुमारास मृतकाच्या बिर्याणी सेंटरवर जावुन मृतकास विचारले की, थंडीपवनी परिसरात एक चांगली प्रॉपर्टी आहे ते बघायची आहे का? असे विचारल्यावर त्यावर मृतक इसमाने होकार दिल्यावरुन दिनांक 16/09/2021 रोजी रात्री 01.30 वा. सुमारास बाहेर जायचे ठरले. त्यानुसार ठरल्याप्रमाणे आरोपी पवन चौधरी याने सोबत अल्पवयीन साथीदाराला घेवुन आपल्या ताब्यातील सुझुकी इको कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम. एच-49-यु-7207 या वाहनाने मृतकाच्या अपार्टमेट समोर आला. मृतक हा फ्लॅट मधुन खाली येताच त्याला गाडीमध्ये बसवुन नागपूर शहरातुन अमरावती रोडनी निघाले. त्यानंतर थंडीपवनी परिसरात जावुन त्याठिकाणी गेल्यानंतर एका ठिकाणी लघवी करायची असल्याचे सांगुन पवन चौधरी याने वाहन थांबविले. मृतक सुध्दा लघवी करण्याकरीता गाडी खाली उतरला. मृतकाच्या गाफील पणाचा फायदा घेवुन पवन चौधरी याने त्याच्या जवळील चाकूने मृतकास सपासप वार करु लागला तसेच त्याचा साथीदार अल्पवयीन मुलाने त्याच्या जवळील काठीने मृतकास मारु लागले. यादरम्यान मृतकाचा मृत्यु झाल्याची खात्री झाल्याने दोघांनी मृतदेह आपल्या वाहनात टाकुन ठरल्याप्रमाणे अमरावती रोड नी परत येवून खापा परिसरातील जंगलात फेकून दिल्याचे सांगीतले. सदरचे कृत्य हे मृतक इसम प्रदिप जनार्दन बागडे यांची पत्नी सिमा प्रदिप बागडे वय 40 वर्षे, रा. फ्लॅट नं.3, सरस्वती अपार्टमेंट, वंजारी नगर पाण्याच्या टाकीजवळ, अजनी, नागपूर हिच्या सांगण्यावरून खून केल्याची माहिती दिली
.*
*सदर प्रकरणात मृतकाच्या खूनाचा उलगडा करुन ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर असल्याचे वरील नमुद आरोपी नामे पवन पांडुरंग चौधरी, वय 21 वर्ष, रा.धडीपवनी, ता.नरखेड, जि. नागपूर, ह.मु. शताब्दी चौकाजवळ, अजनी नागपूर यास माहिती झाल्याने त्याने त्याचा अल्पवयीन साथीदारासह पोस्टे हुळकेश्वर येथे आत्मसमर्पन केले. सदर प्रकरणातील आरोपी पवन चौधरी तसेच सिमा प्रदिप बागडे यांना पोलीस स्टेशन खापा यांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास ठाणेदार अजय मानकर हे करीत आहे.*
*सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला नागपुर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सरंबळकर यांचे मार्गदर्शनात पोस्टे खापा चे ठाणेदार अजय मानकर व त्यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल जिटटावार, सपोनि राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, पोउपनि जावेद शेख, सफो बाबा केचे, पोहवा गजेंद्र चौधरी, मदन आसतकर, पो.ना. राजेंद्र रेवतकर, आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, पोशि विपीन गायधने, रोहन डाखोरे, अमोल वाघ चालक पोहवा भाऊराव खंडाते, अमोल कुथे व सायबर सेल चे सतिष राठोड यांनी पार पाडली.*